Accident – दौंड : पाटस जवळ विचित्र अपघातात एकजण जागीच ठार



| सहकारनामा |

दौंड : पुणे-सोलापूर महामार्गावर असणाऱ्या पाटस जवळ तीन वाहनांच्या विचित्र अपघातामध्ये एकजण जागीच ठार झाला आहे. योगेश मुसमाळे असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून कामगारांची वाहतूक करणारी खाजगी बस आणि फळे, तरकारी वाहतूक करणारी पिकअपला पाठीमागून येणाऱ्या ट्रक ने जोराची धडक दिल्याने मोठा अपघात घडला. 

या अपघातामध्ये ट्रकची धकड बसला बसताच यातील एक कामगार बसमधून खाली पडून  जबर जखमी होत त्याचा जागीच मृत्यू झाला तर यात तीनजण जबर जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये ओमप्रकाश यादव (रा. हडपसर), हिमेश चव्हाण (रा. पुणे) आणि बस चालक मनोहर बंडगर असे तीनजण जखमी झाले आहेत.

अपघातातील ट्रक चालकास पोलिसांनी  ताब्यात घेतले असून या अपघाताबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी दिली.