पुणे : सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस स्टेशन हद्दीत सहा चोरट्यांनी कुरिअर पार्सलच्या गाडीवर दरोडा टाकून सुमारे २५ लाखांचे दागिने लुटले आणि संपूर्ण मुद्देमाल घेऊन दौंड तालुक्यातील यवत परिसरात आले. मात्र याची खबर यवत पोलिसांना लागताच त्यांनी आरोपींना तत्परतेने कासुर्डी टोलनाक्यावर सापळा रचून जेरबंद करत बोरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी हे सोने-चांदीच्या दागिन्यांचे कुरीयर पार्सल पुण्याकडे घेवुन जात असताना काशिळ (ता. जि. सातारा) या गावच्या हद्दीतील हायवे ब्रिजवर फिर्यादीची ताब्यातील गाडीस आरोपी चोरट्यांनी त्यांच्याकडील इनोव्हा गाडी आडवी मारून फिर्यादी व साक्षीदार यांच्या तोंडावर स्प्रे मारला आणि त्यानंतर त्यांच्या ताब्यातील सोन्या, चांदीचे दागिणे त्यांनी जबरदस्तीने घेवुन पोबारा केला होता. यातील आरोपी हे यवत पोलीस स्टेशन (पुणे ग्रामीण) च्या हद्दीत असून ते पुणे-सोलापुर हायवे रोडने जात असल्याची माहिती यवत पोलिसांना मिळाली त्यावेळी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी लागलीच यवत पोलीस स्टेशन येथील सपोनि / स्वप्निल लोंखडे, सपोनि / वाबळे, पोहवा / गणेश कर्चे, पोहवा / राजीव शिंदे, पोहवा / रविंद्र गोसावी,
पोहवा/संदिप देवकर, पोना / अजित इंगवले, पोना / नारयण जाधव, पोना / नुतन जाधव, पोना / दमोदर होळकर, पोशि/सोमनाथ सुपेकर, पोशि/ सागर क्षीरसागर, पोशि / तात्याराम करे, पोशि / टकले, पोशि / समिर भालेराव यांचे पथक तयार करून कासुर्डी टोलानाका येथे नाकांबदी केली.
नाकाबंदी दरम्यान कासुर्डी टोलनाका येथे पुणे ते सोलापुर रोडने सोलापूर बाजुकडे एक ग्रे रंगाची इनोव्हा कार जात असताना पोलिसांना दिसली. पोलीस स्टाफने सदर इनोव्हा कारला हातकरून गाडी बाजुला घेण्याचा इशारा केला असता सदर गाडीतील चालकाने त्याच्या ताब्यातील गाडी रोडच्या कडेला थांबवली. पोलीस गाडीजवळ जाईपर्यंत गाडीतील ६ इसमांनी गाडीतून उतरून जवळ असलेल्या उसाच्या शेतामध्ये पळुन जावु लागले त्यावेळी पोलीस स्टाफने त्यांचा पाठलाग करून ६ पैकी ४ इसमांना पकडुन त्यांचे नाव व पत्ता विचारला असता. त्यांनी त्यांचे नाव १) सर्फराज सलीम नदाफ, २) मारूती लक्ष्मण मिसाळ (दोन्ही रा. कुंभाजे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर) ३ ) सुरज बाजीराव कांबळे ४) करण सायाजी कांबळे (दोन्ही रा. सावर्डे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर) ५) गौरव सुनिल घाडगे (रा. मिनचे, ता. हातकंगणले, जि. कोल्हापुर) असे असल्याचे सांगितले. तसेच बोरगाव पोलीस स्टेशन सातारा गु.र.नं २०० / २०२३ भा.द.वि.क ३९५,३४१,३३६ हा गुन्हा केल्याचे कबुल केले.
पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातील
इनोव्हा गाडी नंबर एम एच ०६ बी एम ३७१८ हिची दोन पंचसमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी १८ किलो ५०० ग्रॅम वजनाची चांदी आणि ७९.४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे तसेच गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा गाडी, छऱ्याचे पिस्टल, चाकु व आरोपींचे मोबाईल फोन असा एकुण २४,७२,८२०/- रू. (चोवीस लाख बहात्तर हजार आठशे वीस रूपये ) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर जप्त
मुद्देमाल व आरोपी बोरगाव पोलीस स्टेशन (सातारा) पोलीस स्टाफच्या ताब्यात देण्यात आले.