दौंड | शहरात दोन दिवस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा राहणार बंद

दौंड शहर : दौंडकरांनो पिण्याचे पाणी काटकसर करून जपून वापरा असे म्हणण्याची वेळ सध्या आली असून पुढील दोन दिवस दौंड शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा राहणार बंद राहणार असल्याचे दौंड नगरपरिषदेने जाहीर केले आहे.

दौंड नगरपरिषदेच्या मालकी हक्काच्या साठवण तलाव आणि जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा होणाऱ्या मुख्य जलवाहिनीस विविध ठिकाणी गळती झाली आहे. त्यामुळे त्याची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे असून दुरुस्तीसाठी दि. 31 मे व 1 जून असे दोन दिवस संपूर्ण दौंड शहराचा पाणीपुरवठा( टँकर पुरवठ्यासह) बंद ठेवण्यात येणार असल्याची सूचना दौंड नगर परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.

दि. 2 जून रोजी नंतर पूर्वीच्या वेळेप्रमाणे पाणीपुरवठा उशिराने व कमी दाबाने होणार असल्याचेही नगर परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तरी दौंडमधील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करून नगर परिषदेस सहकार्य करावे असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.