Nine Hotels Shops Seal – मोठी कारवाई : तहसीलदारांच्या आदेशाने यवत पोलिसांकडून केडगावमध्ये 2 दुकाने सील! संपूर्ण तालुक्यात 9 दुकानांना टाळे



| सहकारनामा |

दौंड : दौंड तालुक्यामध्ये नियमांचा भंग करून सुरू असलेल्या सुमारे 9 दुकान आणि हॉटेल्सला तहसीलदारांच्या आदेशाने यवत पोलिसांनी सिलबंद केले आहे. जर हि दुकाने, हॉटेल्स उघडल्याचे कोणतेही पुरावे सापडले तर त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार दौंड तालुक्याचे तहसीलदार आणि Assi Incident Commander Daund संजय पाटील यांनी या 9 अस्थापणांसाठी आदेश पारित केले असून सदर आदेशाचे तारखेपासुन कोरोनाचा प्रादुर्भाव संपलेचे शासनाकडून सुचना प्राप्त होत नाही तोपर्यंत तसेच या कार्यालयाचा पुढील आदेश होईपर्यंत सिलबंद केले आहेत.

सिलबंद करण्यात आलेली दुकाने, त्यांचे गाव आणि त्याच्या संचालकांची नावे पुढील प्रमाणे आहेत. 



तहसीलदारांकडून सदर आदेश पारित होताच पोलिसांकडून तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली असून संबंधित ग्रामपंचायत यांनी सदर आस्थापना सिलबंद करून कार्यालयाचा आदेश होईपर्यंत सिलबंद राहतील याची खात्री करत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

केडगाव येथील दुकाने सील करण्यासाठी यवत चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केडगाव पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक गंपले, केडगाव ग्रामपंचायतचे सरपंच अजित शेलार पाटील, उप सरपंच अशोक हंडाळ, ग्राप सदस्य, कर्मचारी, पोलीस पाटील हनुमंत हंडाळ हे उपस्थित होते.

या आदेशाचे उल्लंघन करण्याऱ्या आस्थापनेविरूदध पोलीस निरीक्षक, यवत यांनी नियमानुसार गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करावी असेही यात नमूद करण्यात आले आहेत.