Pune Solapur Highway | सुरक्षा रक्षकाच्या डोक्याला ‛पिस्तूल’ लावून ‛कारबाजार’ मधील ‛गाडी’ चोरट्यांनी पळवली

पुणे : संपूर्ण पुणे जिल्ह्यात सध्या चोरट्यांनी धुडगूस घातला आहे. अनेक ठिकाणी घरफोडी, ऐवज पळविण्याचे प्रकार घडत असून आता चोरट्यांनी आपला मोर्चा वाहनांकडे वळवला आहे.

उरुळीकांचन जवळील सोरतापवाडी येथे असणाऱ्या शिव मोटर्स कार बजार येथून आज पहाटे 4:30 वाजता तीन अज्ञात चोरट्यांनी शिव मोटर्स येथील सुरक्षा रक्षकाच्या डोक्याला पिस्तूल लावून अंदाजे 4 लाख रुपये किंमतीची स्विफ्ट डिझायर (Swift Dzire) गाडी नं. MH12-HZ-3737 कार चोरून नेली आहे. याबाबतची माहिती शिव मोटर्स चे मालक झरांडे यांनी दिली आहे. उरुळी कांचन पोलीस घटनास्थळी पोहचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.

झरांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज 14 मे रोजी पहाटे 4.30 वाजता शिव मोटर्स कार बाजार, सोरतापवाडी फाटा येथे तीन चोरटे आले. त्यांच्याकडे धारदार हत्यारे व बंदूक होती. त्यांनी तेथील सुरक्षा रक्षकाच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावून वरील स्विफ्ट डिझायर गाडी चोरून नेली. चोरट्यांकडे काळ्या ग्रे रंगाची टाटा नेकसॉन (Tata Nexon) ही गाडी होती. वरील स्विफ्ट डिझायर गाडी कोणाला अढळल्यास खालील नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन झरांडे यांनी केले आहे.
9921000728,, 9881988989 9850510728,,, 9881353622