बाबो… दौंड शहरातून चक्क 43 लाख 32 हजारांचे 2 मोबाईल टॉवर गेले चोरीला

दौंड : दौंड शहरामध्ये कधी कशाची चोरी होईल सांगता येत नाही. आत्तापर्यंत आपण वाहन, पैसे, सोने-नाणे याची चोरी झाल्याचे ऐकले होते आता मात्र थेट मोबाईल टॉवरचीच चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत नागदिप सद्गुरु पाटकर (वय 40 वर्षे व्यवसाय मॅनेजर जिटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमीटेड मुळ पत्ता माफ्सा गोवा, सध्या रा. महापे नवि मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दौंड शहराजवळ असलेल्या लिंगाळी गावच्या गावचे हद्दीतून दिनांक 31/03/2023 रोजी सायंकाळी 05:30 वाजण्याच्या पूर्वी हे दोन टॉवर चोरीला गेले असून यातील एक टॉवर ज्याची किंमत 11 लाख 71 हजार रुपये आहे. त्याची लांबी 21 मिटर असून त्याचा MAILRIT/K / 09857 असा नंबर होता. तर टॉवर ची किंमत 41 लाख 61 हजार रुपये असून त्याची लांबी ही 50 मिटर लांब होती तर MAH/GBTK/25584 हा त्याचा टॉवर नंबर होता.

दोन्ही टॉवर ची किंमत 43 लाख 32 हजार रुपये असून वरील दोन्ही टॉवर कोणीतरी अज्ञात इसमाने लिंगाळी (ता.दौंड जि.पुणे) या गावच्या गावच्या हद्दीतून चोरी करुन नेले असल्याची फिर्याद टेलिकॉम कंपनीकडून देण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पोसई गोसावी हे करीत आहेत.