स्व.किसनदास गुलाबचंद कटारिया महाविद्यालयात ‘प्लास्टिक मुक्त’ अभियानाचा शुभारंभ

दौंड : स्व. किसनदास गुलाबचंद कटारिया महाविद्यालयामध्ये प्लास्टिक मुक्त अभियानाचा शुभारंभ भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसूख कटारिया यांच्या शुभहस्ते प्लास्टिक मुक्त अभियान रॅलीचे उद्घाटन करून करण्यात आला. याप्रसंगी भीमथडी शिक्षण संस्थेचे चेअरमन विक्रम कटारिया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष समुद्र, सर्व प्राध्यापकवृंद व सेवकवृंद उपस्थित होते.

या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने जनजागृती रॅलीमध्ये सहभागी झाले होते. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी दौंड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ,महात्मा गांधी चौक ,छत्रपती शिवाजी महाराज चौक या प्रमुख चौकामध्ये पथनाट्यद्वारे प्लास्टिक मुक्त पर्यावरणाची जनजागृती केली. रॅली दरम्यान विविध व्यापाऱ्यांना प्लास्टिक वापराच्या दुष्परिणामाची माहिती देऊन मार्गदर्शन केले.रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध पोस्टर्स हातात घेऊन घोषणा दिल्या. रॅलीमध्ये ६०० विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

महाविद्यालयापासून दौंड शहरातील मुख्य मार्गाने रॅली निघाली होती, रॅलीमध्ये भिमथडी शिक्षण संस्थेचे चेअरमन विक्रम कटारिया, प्राचार्य डॉ सुभाष समुद्र,सर्व प्राध्यापकवृंद व सेवकवृंद सहभागी होते . महाविद्यालयातील रॅलीच्या समारोपप्रसंगी राष्ट्रीय हरित सेनेचे पथक प्रमुख प्रमोद काकडे यांनी प्लास्टिकचे दुष्परिणाम, प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करण्याविषयी तसेच उन्हाळ्यातील सुट्टीमध्ये बीज संकलन करून त्याचे सीडबॉल कसे तयार करावे याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजन श्रीकृष्ण ननवरे यांनी केले .