लॉकडाऊनमध्ये जुगार (मटका) अड्डा चालविणाऱ्याची दौंड पोलिसांनी केली धुलाई, मटका चालकावर गुन्हा दाखल



| सहकारनामा |

दौंड : (अख्तर काझी)

शहर व तालुक्यामध्ये कोरोना संसर्गाचा मोठा प्रादुर्भाव होत असतानाही, लॉकडाऊनमध्ये बेकायदेशीरपणे जुगार अड्डा चालविणाऱ्याची दौंड पोलिसांनी येथेच्छ धुलाई करीत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची माहिती दौंडचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे. राहुल सोपान दोडके (रा. कुरकुंभ, दौंड) असे मटका, जुगार अड्डा चालवणाऱ्याचे नाव असून या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

कुरकुंभ गावच्या हद्दीत कुरकुंभ -पांढरेवाडी सेवा मार्गा नजीक असलेल्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला आरोपी राहुल दोडके हा आपल्या ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन बेकायदेशीर असलेला कल्याण मटका खेळवीत असताना दौंडचे पो. निरीक्षक नारायण पवार यांनी या ठिकाणी धाड टाकली यावेळी पोलीसांनी या जुगार अड्डा मालकाची धुलाई करीत त्याच्या विरोधात मुंबई जुगार ॲक्ट व साथीचा रोग अधि नियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून कल्याण मटका जुगाराची साधने जप्त केली आहेत. 

पो. हवा. श्रीरंग शिंदे, पो. कॉ. चांदणे, राऊत, फाळके  यांचा कारवाईत सहभाग होता. सर्वत्र संचार बंदी असतानाही काही बेजबाबदार लोकांकडून शहर व परिसरात बेकायदेशीरपणे जुगार अड्डे चालविले जात आहेत, अशा ठिकाणांची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नारायण पवार स्वतः त्या ठिकाणी जाऊन कारवाई करीत असल्याचे सध्या पहायला मिळत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या फायद्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या जुगार अड्डा मालकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सुट्टी देणार नसल्याचे नारायण पवार यांनी स्पष्ट केले आहे.