दौंड : गड्याचे वय 21 आणि आत्तापर्यंत त्याने केलेले गुन्हे उघडकीस आले आहेत 18, हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता असून कमी वयात इतके गुन्हे केलेल्या हड्ड्या ला अखेर यवत पोलिसांनी जेरबंद केले आहे. हड्ड्यावर घरफोडी व वाहने चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १६/०४/२०२३ रोजी पहाटे ०१.३० वा चे सुमारास वरवंड (ता. दौड जि. पुणे) या गावच्या हद्दीत गोपीनाथ मंदिराजवळ इसम नामे हड्ड्या उर्फ रवी उर्फ शंकर मधुकर पवार (वय २१ रा.पेनूर ता मोहोळ जि. सोलापूर) हा रात्रीच्या वेळी चोरी अथवा घरफोडी करण्याच्या उद्देशाने फिरत असताना मिळून आला. तो वाहन चोरी, घरफोडी असे गंभीर मालमत्ते विरुद्ध गुन्हे करणाऱ्या टोळीतील सदस्य असून त्याच्याकडून खालील गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
१)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.३६९/२०२३ भा. द.वि. कलम ४०१
२)बारामती शहर पोलीस स्टेशन १६२/२०२३ भा.द.वि .कलम ४५७,३८०,५११
३) शिरगांव- परंदवडी पो.स्टे ८७/२०२३ भा.द.वी.कलम ३७९
तसेच सदरचा आरोपी हा फौजदार चावडी पोलीस स्टेशन सोलापूर शहर गु.र.नं.१७/२०१७ भा.द.वि. कलम ३७९,३४मध्ये पाहिजे आरोपी असून त्याचेवर पुणे ग्रामीण , सोलापूर ग्रामीण,अहमदनगर,पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागात व कर्नाटक राज्यात खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) लोणावळा शहर पो.स्टे गु.र.नं. २८७/२०१९ भा.द.वि. कलम ४५७,३८०
२) लोणावळा शहर पो.स्टे गु.र.नं. २८७/२०१९ भा.द.वि. कलम ३७९,४६१
३) सोलापूर शहर एम.आय. डी. सी. पो.स्टे गु.र.नं १६९/२०१८ भा.द.वि. कलम ४५७,३८०
४)मोहोळ पो.स्टे गु.र.नं. ५६६/२०१७भा.द.वि. कलम ४६१
५)श्रीगोंदा पो.स्टे गु.र.नं. १७०/२०२१ भा.द.वि. कलम ३९७
६)आळंद(कर्नाटक) पो.स्टे गु.र.नं. ८४/२०२२ भा.द.वि. कलम ३७९
७)गाणगापूर (कर्नाटक) पो.स्टे गु.र.नं. ११६/२०१४भा.द.वि. कलम ४०१
८) पंढरपूर शहर पो.स्टे गु.र.नं. १९३/२०१४ भा.द.वि. कलम ३८०
९)पंढरपूर शहर पो.स्टे गु.र.नं. ४२६/२०२२ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८०
१०)पंढरपूर शहर पो.स्टे गु.र.नं. ४८३/२०२२ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८०
११)पंढरपूर शहर पो.स्टे गु.र.नं. ४९७/२०२२ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८०
१२)पंढरपूर तालुका पो.स्टे गु.र.नं. ४०१/२०२२ भा.द.वि. कलम ३८०
१३)पंढरपूर तालुका पो.स्टे गु.र.नं. ५८५/२०२२ भा.द.वि. कलम ४५७,३८०
१४)पंढरपूर तालुका पो.स्टे गु.र.नं. ७२२/२०२२ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८०
१५)हडपसर पो.स्टे गु.र.नं. २२९/२०२३ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८०
असे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल ,अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस.स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, पोसई संजय नागरगोजे, पोसई प्रशांत मदने, पोलीस हवालदार निलेश कदम, पोलीस हवालदार गुरूनाथ गायकवाड, पोलीस हवालदार अक्षय यादव, पोलीस हवालदार गणेश कुतवळ, पोलीस हवालदार महेंद्र चांदणे, पोलीस हवालदार रामदास जगताप, पोलीस नाईक अमित यादव, पोलीस शिपाई मारुती बाराते यांच्या पथकाने केली आहे.