मुंबई : सध्या राज्यात राजकीय वातावरण तापल्याचे पहायला मिळत आहे. दुपारी अजितदादांनी आपल्या फेसबुक, ट्वीटर हॅन्डलवरून राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह हटवले आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजल्याचे पहायला मिळाले.
अजित पवारांनी पक्ष चिन्ह हटवताच आता अजितदादा भाजप सोबत जाणार, 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र त्यांच्याकडे आहे अश्या बातम्या येऊ लागल्या आणि आता काही वेळातच पुन्हा अजित पवारांचे एक ट्वीट समोर आले आणि अजितदादांच्या मनात नेमकं आहे तरी काय हे ओळखण्याच्या नादात मिडिया सुद्धा बुचकाळ्यात पडल्याचे पहायला मिळाले आहे. अजितदादांनी आता थेट सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमावेळी लोक मृत्यूमुखी पडण्याची जी घटना घडली आहे. या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा. तसंच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 20 लाख, तर उष्माघातामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोफत उपचारासह प्रत्येकी 05 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे अजित पवारांनी पत्राद्वारे केली आहे.
अजित पवारांच्या या ट्वीटमुळे नेमकं दादांच्या मनात काय चाललंय हे आता त्यांच्याशिवाय दुसरा कोणीच अंदाज लावू शकत नाही हे मात्र आता सर्वांना समजून चुकले आहे.