पारगावमध्ये ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ जयंतीनिमित्त निघालेली मिरवणूक ‘मशिदी’समोर येताच मुस्लिम तरुणांनी केले असे काही कि…

दौंड : दौंड तालुक्यातील पारगाव (सालू मालू) हे सध्या कोणत्या न कोणत्या कारणाने सतत गाजत असलेले गाव आहे. काल रात्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक निघून ती मशिदीसमोर येताच मुस्लिम सामाजतील तरुणांनी मिरवणूकीत आलेल्या बौद्ध बांधवांना शरबत आणि पाणी वाटप करत सामाजिक सलोखा जपला तर बौद्ध बांधवांनी मशिदीसमोर मिरवणूक आल्यानंतर ‘मै तो दिवानी, ख्वाजा कि दिवानी’ ही कव्वाली लावून मुस्लिम बांधवांप्रति आपले सामाजिक प्रेम व्यक्त केले.

सायंकाळी सहा वाजता सुरु झालेली मिरवणूक रात्री पावणे नऊ वाजण्याच्या दरम्यान पारगावच्या जामा मस्जिद समोर आली. यावेळी मुस्लिम बांधवांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आपली सामाजिक बांधिलकी जपली. बौद्ध आणि मुस्लिम समाजबांधवांनी सामाजिक बांधिलकी कशी जपावी याचे उत्तम उदाहरण काल गावासमोर ठेवले आहे.

सध्या सामाजिक वातावरण दूषित होण्याच्या अनेक घटना समोर येत असताना, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि एक-दुसऱ्याच्या समाजाचा आदर करणाऱ्या काही घटनाही समोर येत आहेत. त्यामुळे जातीवाद आणि धर्मवाद करणाऱ्या संधी साधूंना ही मोठी चपराक असू शकते यात शंका नाही.