|सहकारनामा|
दौंड : दौंड पोलीसांनी अवैध दारू भट्टीवर मोठी कारवाई करत सुमारे १० बॅलर मधील १५०० लिटर रसायन आणि इतर असा ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.
दौंड तालुक्यातील मलठण गावच्या हद्दीत दिनांक २२/०५/२०२१ रोजी चव्हाण वस्ती येथे ओढयाच्या कडेला काटवाणात आरोपी निलेश जगन्नाथ लोंढे (रा.ज्योतीबानगर ता.दौंड जि.पुणे) हा अंदाजे २०० लिटर मापाचे १० प्लॅस्टीकचे बॅलर त्यामध्ये १५०० लिटर भरलेले कच्चे रसायन व ५०० लिटर मापाची एक लोखंडी पत्र्याची टाकीचा वापर करून हातभट्टी दारूची भट्टी लावून – दारू काढत आहे अशी खात्रीशिर माहीती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना मिळाली होती.
हि माहिती मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सुशिल लोंढे, पो.कॉ करे, पो.कॉ.राउत यांच्यासह या ठिकाणी छापा टाकला असता आरोपीस पोलीसांची चाहूल लागताच पळून गेला आहे.
सदर ठिकाणाहून एकूण ३१,५००/- रूपयांचा मिळालेला माल जागीच नष्ट करण्यात आला असून दौंड पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नंबर २७१/२०२१ मुंबई प्रोव्हीबीशन कायदा कलम ६५(फ) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुन्हयाचा पुढील तपास पो.ना वलेकर हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.