दौंड : दौंड तालुक्यातील राहू येथील ग्रामपंचायतीमध्ये महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आज भगवान महावीर यांची २६२२ वी जयंती असून ती राहू च्या ग्रामपंचायतीमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.
राहू गावचे सरपंच दिलीप देशमुख सर यांनी सर्व जैन धर्मियांना व ग्रामस्थांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा देताना, भगवान महावीर यांची शिकवण सत्य व अहिंसा अंगीकारणे गरजेचे आहे असे सांगितले. यावेळी त्यांनी राहू येथील जैन समाज व राहू गाव यांची जोडलेली नाळ याचे विवेचन केले. यावेळी भारतीय जैन संघटना पुणे विभाग उपाध्यक्ष हर्षल भटेवरा यांनी बोलताना, २४ वें तीर्थंकर भगवान महावीर यांनी वयाच्या 30 व्या वर्षी संपूर्ण सुख, वैभव व राजपाट सोडून तपोमय साधनेचा मार्ग अवलंबला व सुमारे साडेबारा वर्ष तपश्चर्या करून सर्व इच्छा व विकार यांच्यावर नियंत्रण मिळवले म्हणून त्यांना वर्धमान असे संबोधले जाते. ते जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर होते भगवान महावीर यांनी अहिंसा, सत्य व शाकाहार आणि संपूर्ण प्राणीमात्रावर मानव प्रेम करण्याची शिकवण दिली असे सांगितले.
यावेळी प्रकाश भटेवरा यांनी, भगवान महावीर यांच्या ‘अहिंसा परमो धर्म’ या शिकवणीनुसार जैन धर्म वाटचाल करत असतो असे मनोगत व्यक्त केले. यावेळी राहू गावचे सरपंच दिलीप देशमुख सर, बंडोपंत नवले, किसन दादा शिंदे सुरेश बापू शिंदे, रामभाऊ कुल, चिमाजी कुल,अरुण नाना नवले, पृथ्वीराज भैय्या जगताप, संदीप सोनवणे, किशोर गाढवे, लवंगे महाराज, श्री जैन श्रावक संघाचे शांतीलाल भटेवरा, प्रकाश भटेवरा, धरमचंद भटेवरा, हर्षल भटेवरा, सुनील भटेवरा, सोहनराज भटेवरा यांसह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी उपस्थित होते.