मुंबई : राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना शिंदे गटाच्या शितल म्हात्रे यांच्यामध्ये सध्या मोठा ट्वीटर वार सुरु झाला आहे. शितल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांचा उर्दूमध्ये लागलेल्या फ्लेक्सचा फोटो ट्वीटरवर शेअर करून
“मातीत छत्रपती शिवाजीमहाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवल होतं..”
नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही?
हीच का तुमची हिंदुत्वादी विचारधारा?? असा सवाल उपस्थित केला.
या ट्वीटला जितेंद्र आव्हाड यांनी रिट्वीट करून म्हात्रे यांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो शेअर केला आणि
“ह्याच्यावर बोला ताई .. खास तुमच्या माहिती साठी..कारण नंतर दुसऱ्यावर ढकलायची तुमची सवय आहे” असे ट्वीट केले.
जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट पाहून शितल म्हात्रे चांगल्याच खवळल्या आणि
“मुंब्र्यात कधीही शिवजयंती साजरी न करणा-या जितेंद्र आव्हाडांना ट्विट चांगलाच झोंबलेलं दिसतयं… पण मला एक समजत नाही मी बॅनर उद्धवजींचा टाकलाय आणि धूर चक्क राष्ट्रवादीमधून आलाय…” असा उपरोधक टोला रिट्वीट करत लगावला.
मग काय पुन्हा जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना रिट्वीट करत “मला काम करताना गवगावा करण्याची सवय नाही … लोकानसाठी कार्येक्रम करतो .. माझ्या मतदार संघात येऊन विचारा …. उघड्यावर लाज घालवणारे कृत्य मी करत नाही …. आठवतेना काय ते ढुं..ण काय तो दांडा… धूर कुठुन निघाला.. असे उत्तर दिले.
या उत्तराने चिडलेल्या शितल म्हात्रे यांनी आव्हाडांना पुन्हा रिट्वीट करून
“पवारांची भाकरी आणि उद्दवजींची चाकरी
…. लगे रहो भाईजान” असा टोला लगावला आणि मग मात्र आव्हाडांनी आपल्या शब्दांच्या भात्यातील प्रमुख अस्त्र चालवत “त्याची आपल्याला चिंता नसावी..उगगाच बोलायला लावू नका,…घरचा उपाशी बाहेरचा तूपाशी” असे ट्वीट करून या वादाच्या आगीत जणू पेट्रोल ओतण्याचे काम केले आहे.
त्यामुळे आव्हाड विरुद्ध म्हात्रे यांचे ट्वीटर वॉर सध्यातरी थांबण्याची चिन्हे दिसत नसून आता पुढे म्हात्रे कसा पलटवार करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.