दौंड : दौंड तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी दिली आहे.
शेतकरी बांधवांना आपला शेतमाल बाजारपेठे पर्यंत पोहोचविण्यासाठी दर्जेदार रस्ते मिळावेत या उद्देशाने दौंड तालुक्यातील प्रमुख रस्त्याच्या कामासाठी निधी मिळवा अशी मागणी आमदार अॅड. राहुल कुल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे केली होती.
आमदार राहुल कूल यांनी केलेल्या मागणीनुसार दौंड तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा भरघोस निधी मिळाला असून, दौंड तालुक्यातील प्रत्येक घटकांचा विकास करण्यासाठी यापुढील काळात देखील प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी यावेळी सांगीतले.
दौंड तालुक्यातील प्रमुख रस्त्याच्या कामासाठी मिळालेला निधीची माहिती पुढील प्रमाणे
१) टेळेवाडी ते वाळकी ते रांजणगाव सांडस रस्त्याची सुधारणा करणे – ५ कोटी
२) मेमाणवाडी ते पानवली रस्त्याची सुधारणा करणे – ५ कोटी
३) पाटेठाण ते देवकरवाडी व दहिटणे ते खामगाव रस्त्याची सुधारणा करणे – ४ कोटी ५० लक्ष
४) नविन गार ते रेल्वे गेट व गिरिम ते कुरकुंभ रस्त्याची सुधारणा करणे – ४ कोटी ५० लक्ष
५) गार फाटा ते गार रस्त्याची सुधारणा करणे – ४ कोटी ५० लक्ष
६) तांबेवाडी (खामगाव) ते खुटबाव रस्त्याची सुधारणा करणे – ४ कोटी
७) कासुर्डी ते बोरीऐंदी रस्त्याची सुधारणा करणे – ३ कोटी
८) वाखारी ते केडगाव व दापोडी ते नानगाव रस्त्याची सुधारणा करणे – ३ कोटी
९) हिंगणीगाडा ते मळद रस्त्याची सुधारणा करणे – ३ कोटी
१०) राजेगाव ते खानोटा रस्त्याची सुधारणा करण – ३ कोटी
११) केडगाव टोलनाका ते पिंपळगाव व उंडवडी ते खामगाव रस्त्याची सुधारणा करणे – २ कोटी ५० लक्ष
१२) हिंगणीबेर्डी ते देऊळगावराजे फाटा रस्त्याची सुधारणा करणे – २ कोटी
१३) धुमाळवस्ती पांढरेवाडी ते कुरकुंभ रस्त्याची सुधारणा करणे – २ कोटी
१४) वाळकी संगम ते वाळकी रस्त्याची सुधारणा करणे – २ कोटी
१५) वडगाव पुल ते वडगाव ते पेडगाव रस्त्याची सुधारणा करणे – २ कोटी
अर्थसंकल्पात मिळालेल्या या भरघोस निधीमुळे दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात देखील मजबूत रस्त्यांचे जाळे यामुळे निर्माण होणार असल्याने शेतकरी व नागरिकांनी आमदार कुल यांचे आभार मानले आहेत.