मुंबई : गुढी पाडव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर घेतलेल्या सभेत सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांना लक्ष करत, शिवसेनेचं तुझं की माझं पाहून वेदना होत होत्या. त्यावेळी म्हणतं होतो हिच चार टाळकी पक्ष खड्ड्यात घालणार त्यामुळे त्यातून त्यावेळीच बाहेर पडलो. 2006 ला मनसे पक्ष याच शिवतीर्थावर स्थापन केला. त्यावेळी मला शिवसेना अध्यक्ष व्हायचं म्हणून पक्ष सोडला अश्या काही गोष्टी पसरवल्या गेल्या होत्या पण ते खोटं होतं. बाळासाहेब सोडून शिवधनुष्य कोणाला पेलणार नाही. शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, उद्धव ठाकरे यांना एका ठिकाणी घेऊन गेलो आणि विचारलं सांग तूला काय हवंय. अध्यक्ष व्हायचंय हो. जे व्हायचंय ते हो पण माझं काम काय ते सांग त्यावेळी त्यांनी मला काही नको म्हणून म्हटले, घरी बाळासाहेबांना भेटून सर्व सांगितलं आणि सर्व व्यवस्थित केलंय म्हटलं तर त्यांनी मिठी मारली आणि उद्धवला बोलवलं. पण ते बाहेर निघून गेले. नारायण राणे पक्षातून जात नव्हते ते बाळासाहेबांना भेटायला निघाले पण त्यांना कुणीतरी सांगितलं आणि त्यांनी भेट नाकारली अशी टिका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
पुढे बोलताना त्यांनी, मी बाहेर पडलो त्यावेळी पक्ष काढायचं मनी ध्यानी नव्हतं, कारण बाळासाहेबांच्या समोर पक्ष काढायची इच्छा नव्हती पण लोकांचा पाठिंबा वाढत गेला मागणी होत राहिली म्हणून पक्ष काढला.
अडीच वर्षापूर्वी शिवसेना भाजप ने एकत्र निवडणूक लढवली. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं अडीच वर्ष मुख्यमंत्री आमचा असेल मग शहा, मोदी भाषणात बोलत होते की पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होतील त्यावेळी गप्प का बसला होता. ज्यांच्या विरोधात निवडणूक लढविली त्यांच्यासोबतच सत्ता स्थापन केली असे म्हणून सत्ताधारी पक्षाला टोमणा मारताना अली बाबा आणि त्याचे 40 जण गेले, यालाच कंटाळून गेले पण मी त्यांना चोर म्हणणार नाही, महाराज सुरत लुटून आले हे माहित होतं पण महाराष्ट्रातून लूट करून सुरतला गेलेले हे पहिलेच. एकनाथ शिंदे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात त्यामुळे महाराष्ट्रासाठी काम करा, त्यांनी सभा घेतली की तुम्ही त्यांच्या मागे सभा घेत बसू नका असा सल्ला त्यांनी दिला.
मुंबईच्या दिव्यांबाबत बोलताना, मुंबई आहे की डान्स बार हेच कळत नाही. सगळीकडे दिवे लावून ठेवले आहेत. सुशोभीकरणाच्या नावाखाली 1700 कोटी रुपये खर्च केले.
नविन उद्योग येताना दिसत नाहीत, बेरोजगारी आ वासून उभे आहेत, ते सरकारकडे बघतायत आणि सरकार न्यायालयाच्या निकालाकडे बघतंय आरे हे चाललंय काय, असे असेल तर आत्ताच निवडणुका लावा होऊन जाऊद्या एकदाच दूध का दूध पाणी का पाणी असे आव्हान त्यांनी दिले. पुढे धार्मिक गोष्टींवर बोलताना, मला धर्मांध हिंदू नको तर धर्माभिमानी हवेत आणि मला जावेद अख्तर सारखे मुस्लिमही हवेत. त्यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांची लायकी काढली. त्यांना तेथे सुनावून आले. आमच्या मुंबईवर हल्ला तुमच्या लोकांनी केला हे त्यांना सुनावलं.
मागील गुढी पाडव्याला सांगितलं होतं की मशिदिंवरील भोंगे बंद करा, त्यावेळी हजारो मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाले. आता पुन्हा सांगतोय एकतर भोंगे बंद करा अन्यथा आमच्याकडे दुर्लक्ष करा. एक गंभीर बाब माझ्यासमोर आली. समुद्रात मला लोकांची गर्दी दिसली. त्यावेळी ड्रोनमधून माझ्याकडे काही क्लिप आल्या त्यामध्ये काही मुस्लिम लोक समुद्रातील दर्गामध्ये जात होते. हे अगोदर नव्हते 2 वर्षात येथे उभे केले. पण सर्वांनी याकडे दुर्लक्ष केले. हे आता येथे नविन हाजीअली आणणार. त्यामुळे मी सर्व प्रशासनाला सांगतो की ती वास्तू जर महिन्यात काढली नाही तर तेथे मग मोठे गणपती बांधले जाईल. एकदा जर राज्य माझ्या हातात आले ना तर सर्वांना सुतासारखे सरळ करीन. असले प्रकार येथील मुस्लिमांना तरी मान्य आहे का, कोणाची समाधी आहे तीमाशाची आणि कसली. येणारी रामनवमी हिंदूंनी जोरात साजरी करा. मी रायगडावर जाणार आहे आणि तुम्हीही या. दक्ष रहा, आजूबाजूला लक्ष ठेवा अन्यथा कधी पायाखालची जमीन निघून जाईल सांगता येत नाही.