दौंड : छत्रपती शिवाजी महाराज व जागतिक महिला दिनानिमित्त माय रमाई फाउंडेशन च्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यामध्ये दौंडच्या योगिता रसाळ यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत फाउंडेशन च्या वतीने त्यांना रमाईची लेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यातील 40 महिलांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कामशेत येथे संपन्न झालेल्या या सोहळ्याला माय रमाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अमर चौरे, मावळच्या अध्यक्षा मंगल चौरे, महिलांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या तृप्ती देसाई, तसेच फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
समाजातील निराधार, विधवा, अपंग व्यक्तींना संजय गांधी पेन्शन मिळवून देणे, विविध शासकीय योजना समाजापर्यंत पोहोचविणे, पत्रकारितेतून समाजासमोर वास्तव चित्र आणणे, समुपदेशनाद्वारे कुटुंबातील तंटा, कलह मिटविण्याचा प्रयत्न करणे, महिला सबलीकरण करणे आदी सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा फाउंडेशन च्या वतीने गौरव करण्यात येतो असे योगिता रसाळ यांनी सांगितले.