social work : ‛दौंड’च्या लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील गरजूंना धान्याचे वाटप, ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील यांचा पुढाकार



 

|सहकारनामा|

दौंड : कोरोना महामारीमुळे सर्वांचेच मोठे नुकसान झाले आहे. प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या अडचणींना सामोरे जातो आहे. कोणी नोकरी, व्यवसाय वाचवायचा प्रयत्न करतो आहे तर कोणी पोटाची खळगी कशी भरावयाची या प्रयत्नात दिसतो आहे. 

अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये येथील राजकीय पक्ष, संघटना आपापल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपणही या समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने. असाच एक स्तुत्य उपक्रम येथील लिंगाळी ग्रामपंचायत सदस्य संदीप येडे व मसनर वाडीच्या पोलीस पाटील अश्विनी बगाडे यांनी राबविला. या दोघांनी लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील मसनेरवाडी, येडे वाडी, जगताप मळा, मेरगळ मळा, शाहूनगर( जगदाळे वस्ती) येथील गरजूंना धान्याचे वाटप केले. 

यावेळी लिंगाळी चे सरपंच सुनील जगदाळे, उपसरपंच वैजयंता चितारे,  संजय येडे, सचिन हजारे, आशा सेविका मालन येडे आदि उपस्थित होते. पोलीस पाटील अश्विनी बगाडे यांनी यावेळी ग्रामस्थांनी कोरोना काळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.