दौंड : पिडीसीसी बँकेतील दौंड तालुक्याचे विभागीय अधिकारी नीलेश सुदामराव थोरात
यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सेवक सहकारी पतसंस्थेच्या
संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निलेश थोरात यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्यावर तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सेवक सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदासाठी निवडणुक लागल्यानंतर निलेश सुदामराव थोरात, रावसाहेब कामठे, नानासाहेब पाटोळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र माजी आमदार रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरील उमेदवारांनी निलेश थोरात यांना पसंती दर्शवत आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि नीलेश थोरात यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे निलेश थोरात यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी दौंड तालुक्याचे माजी आमदार तथा पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सिंचन भवनमधील सहायक निबंधक अरुण सकोरे यांनी कामकाज पाहिले. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी संजय गरदडे, राजेंद्र खैरे, अविनाश हातवळणे, संदीप भागवत, राजेंद्र खळदकर, रफीक सय्यद, दौंड तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक विकास अनिल कांबळे यांसह बँकेचे विविध पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.