Daund – कृत्रिम तुटवडा निर्माणकरून चढ्या दराने खते, बियाणे विक्री करणाऱ्या दुकानांचे परवाने रद्द करण्याची बहुजन मुक्ती पार्टीची मागणी



|सहकारनामा|

दौंड : शेतकऱ्यांना जुन्या दरापेक्षा ही ५०%  दराने रासायनिक खते व बी-बियाणे यांची मुबलक उपलब्धता करून देणे व शेतकऱ्यांच्या नाशवंत शेतीमाल विक्रीसाठी तसेच शेतीशी निगडित वस्तू खरेदीसाठी शेतीशी निगडित सर्व दुकाने व व्यवस्थापन दिवसभर सुरू ठेवण्याची मागणी दौंड तालुका बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.                                खते बी-बियाणे जुन्या दरापेक्षा ही ५० %  दराने वेळेत व मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत, नाशवंत भाजीपाला, फळभाज्या व फळे आणि शेतीशी निगडित आवश्यक वस्तूंची दुकाने योग्य ते व्यवस्थापन करून दिवसभर सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, तातडीने नवीन पीक कर्ज वाटप करण्याचे संबंधित बँकांना आदेश द्यावेत, बोगस बियाणे विक्री किंवा कृत्रिम तुटवडा निर्माण करून चढ्या दराने खते बी-बियाणे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तात्काळ कार्यवाहीचे आदेश देऊन त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्यात यावे आदि मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.                           या प्रसंगी बहुजन मुक्ती पार्टिचे पुणे जिल्हा संघटक  गोरख जगन्नाथ फुलारी  तसेच बहुजन मुक्ती पार्टीच्या महिला आघाडीच्या दौंड तालुका प्रभारी पुष्पाराणी बनकर,  अशोक मोरे,  रामचंद्र भागवत, डॉ. जगताप, निलेश बनकर इ. कार्यकर्ते उपस्थित होते.