‘सासवड’ जवळ ऑटो रिक्षामध्ये असलेला देशी-विदेशी दारूसाठ्यासह 2 लाख 16 हजारांचा मुद्देमाल ‘जप्त’

सासवड : सासवड जवळ असणाऱ्या कोडीत गावामध्ये अवैधरित्या जमविण्यात आलेला देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात सासवड पोलिसांना यश आले आहे.

आरोपी,मुद्देमालासह पोलिस पथक

मिळालेल्या माहितीनुसार दि.02 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 6ः30 वा. पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांना, सासवड पोलीस स्टेशन हददीतील कोडीत ‘‘बु’’ या गावाच्या नंदी चौकात उत्तम राजिवडे हा त्याचे ऑटो रिक्षामध्ये देशी विदेशी दारूच्या बाटल्यांचा साठा जवळ बाळगुन ओळखीचे लोकांना विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रूपेश भगत, लियाकतअली मुजावर, गणेश पोटे, होमगार्ड/विक्रम जगताप हे कोडीत गावात जाऊन उत्तम राजिवडे यांचे घरासमोर थांबले त्यावेळी त्यांना तेथे एका काळे पिवळे रंगाची रिक्षा गाडी दिसली. त्यांनी त्या रिक्षाची पाहणी केली असता त्यामध्ये दोन खाकी रंगाचे बाॅक्समध्ये देशी विदेशी दारूच्या बाटल्या भरलेल्या दिसल्या.

यावेळी त्या रिक्षात बसेलेल्या इसमास त्याचे नाव, पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव उत्तम हरिभाउ राजिवडे, (वय.56 वर्शे, रा.कोडीत ‘‘बु’’, नंदी चैक, ता.पुरंदर, जि.पुणे) असे असल्याचे सांगितले. पोलिस पथकाने दारूसाठा,रिक्षा जप्त करत सदर इसमावर सासवड पो.स्टे.गु.र.नं. 73/2023 महाराश्ट्र दारूबंदी कायदा क. 65(ई) अन्वये कारवाई केली.

आरोपी हा या अगोदरही असे कृत्य करत आला असून त्यावर यापुर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत आरोपीकडून 2 लाख 16 हजार 445 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

1)सासवड पो.स्टे. गु.रजी.नं. 93/2021 महाराश्ट्र दारूबंदी कायदा. 65(ई).
2)सासवड पो.स्टे. गु.रजी.नं. 38/2023 महाराश्ट्र दारूबंदी कायदा. 65(ई).

वरील कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती आनंद भाईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी, भोर विभाग धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सासवडचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, पोलीस हवालदार रूपेश भगत, लियाकतअली मुजावर, गणेश पोटे, होमगार्ड विक्रम जगताप यांचे पथकाने केलेली आहे.