|सहकारनामा|
दौंड : दौंड तालुक्यातील यवत जवळ असणाऱ्या हॉटेल कांचन ला मोठी आग लागल्याची माहिती मिळत असून हि आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली आहे हे मात्र अजून समजू शकले नाही.
पुणे सोलापूर महामार्गावर हॉटेल कांचन असून संपूर्ण परिसरात हे हॉटेल व्हेज जेवणासाठी फेमस आहे. साधारण दुपारी 3 वाजण्याच्या आसपास हि आग लागल्याचे समोर येत असून नेमकी कशामुळे लागली हे मात्र अजून समजू शकले नाही.
आग लागल्याची माहिती समजताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून आग विझविण्यासाठी आगीचे बंब बोलाविण्यात आले आहेत. या आगीत हॉटेल चे मोठे नुकसान झाले आहे.