दौंड शहराचे नाव उज्वल करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा ‘सन्मान’

दौंड : स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ जयंती तसेच जागतिक युवक दिनाचे औचित्य साधित दौंड मधील रणवीर व्यायाम मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करीत दौंड चे नाव उज्वल करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी मंडळाच्या सुवर्ण महोत्सवाच्या स्मरणीकेचा प्रकाशन सोहळा ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. आमदार राहुल कुल, मा. आमदार रमेश थोरात, मा. नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, इंद्रजीत जगदाळे, मा.नगरसेवक प्रवीण परदेशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

दौंड शहराचा नावलौकिक वाढविणाऱ्या संस्था व व्यक्ती-
दौंड रेल्वे सेवानिवृत्त कर्मचारी संघटना (नारायण कावळे), श्री वाहेगुरू सेवा संघटना (राम दावरा), लाडली गोशाला गोपालन संस्था, हरित क्रांती सेना (प्रमोद काकडे), अविश्री बाल सदन संस्था (अनिल कटारिया), अपंग -गतिमंद विद्यार्थी शाळा,वस्तीगृह (प्रशांत भंडारी), गुजराती कोविड सेंटर (पोकार ग्रुप), डॉ. हेडगेवार स्मृती समिती (दत्ताजी शिणोलीकर), सूर्यकांत जठार (कारगिल युद्धात सहभाग), मंगेश वैद्य (कोन बनेगा करोडपती कार्यक्रमामध्ये निवड), प्रल्हाद जाधव (वृक्ष संवर्धन, प्राणी मित्र), रामेश्वर मंत्री (अपंगासाठी प्रहार संघटना), सचिन कुलथे (शहरामध्ये शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी मोलाचे योगदान), प्रताप खानविलकर (युवा पिढीस लाठीकाठी, ढाल- तलवार चालविणे प्रशिक्षण), दिलीप परदेशी (सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व क्रीडा कार्यात विविध शहरांच्या 16 पुरस्कारांचे मानकरी)
तसेच या सोहळ्यासाठी विशेष उपस्थित असलेले उदय संभाजी जगताप, संदीप टेंकळे, दत्तात्रय पारपल्लीवार यांचाही मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास रणवीर व्यायाम मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच आजी-माजी सभासद यांचे मोलाचे योगदान लाभले.