दौंडमध्ये दिवसाढवळ्या 1 लाख 53 हजारांची घरफोडी

दौंड : दौंड शहरामध्ये एका घराचे कुलूप तोडून सुमारे 1 लाख 53 हजारांच्या मुद्देमालाची घरफोडी करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत अक्षय बाळासो बनकर (वय 22 वर्षे रा. भागवतवस्ती, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक- 5/1/2023 रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.00 वाजण्याच्या दरम्यान गोपाळवाडी ता.दौंड या गावच्या हद्दीतील भागवतवस्ती येथे फिर्यादी यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडुन घरातील खालील पैकी मुद्देमाल चोरून नेला.

1) 45,000/- रुपये किंमतीचा एक सोन्याचा लक्ष्मी हार, 2) 14,000/- रुपये किंमतीचा दोन सोन्याचे कानातील चैन 3) 22,000/- रूपये किंमतीचा दोन सोन्याचे कानातील टॉप्स, 4) 4,000/- रुपये किंमतीचे एक ग्रॅम वजनाचा सोन्याचा मणी, 5) 3300/- रुपये किंमतीचे चांदिचे दोन पैंजन, 6) 12,00/- रुपये किंमतीचे चांदिचे हातातील ब्रेसलेट, 7) 3,800/- रुपये किंमतीचे चांदिचे दागिने, 8) 60,000/- रुपये रोख रक्कम त्यामध्ये 500 रुपये दराच्या 120 नोटा असा एकूण 1 लाख 53 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

या घटनेचा अधिक तपास सपोनि गटकुळ हे करीत आहेत.