दिल्ली : देशाला हादरवून सोडणाऱ्या कांजवाला येथील रस्ता अपघात प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत चालले आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असून आता प्रकरणातील मृत अंजलीची मैत्रीण आणि मुख्य साक्षीदार निधी हिच्या आईने या प्रकरणात मोठा खुलासा केला आहे.
पीडितेच्या कुटुंबीयांनी मृताची मैत्रिण निधीवर ती खोटे बोलत असून काहीतरी लपवत असल्याचा गंभीर आरोप केले असतानाच निधीच्या आईने एक महत्वपूर्ण खुलासा करताना, अंजली हिचा अपघात नसून तिला कारच्या खाली अनेकवेळा चिरडण्यात आले असा धक्कादायक खुलासा केला आहे. निधीच्या आईने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले कि, ज्यावेळी हि घटना घडली त्यानंतर निधी घरी आली आणि तिने मला सर्व हकीकत सांगितली. निधीने आई ला सांगितले कि ज्यावेळी कार ने अंजलीला उडवले त्यावेळी ती कार तिच्या अंगावरून अनेकवेळा मागे पुढे करण्यात आली. त्यामुळे हा ॲक्सीडेन्ट आहे की खून याबाबत आता संशय अधिक दाट होताना दिसत आहे.
या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृत अंजलीच्या कुटुंबीयांनी केली आहे असून अंजलीची हत्या झाली असून निधीचाही या सगळ्यात कुठेतरी सहभाग असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणात आत्तापर्यंत पाच लोकांना अटक करण्यात आली असून यात एका स्थानिक भाजप पदाधिकाऱ्याचा समावेश आहे.