Daund Murder Case |कोयत्याने ‘वार’ झालेल्या ‘फार्मासिस्ट’ मयूर चितारेला ‘ज्या’ दवाखान्यात नेले तेथे तपासायलाच आली त्याची सख्खी ‘डॉक्टर’ बहिण अण…

Crime News : अब्बास शेख

काल सायंकाळी मयूर चितारे याच्या दौंड शहरात झालेल्या हत्येने एकच खळबळ माजली असून मयूरला ज्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्याच दवाखान्यात त्याची सख्खी बहीण डॉक्टर असून ती त्याला तेथे तपासण्यासाठी उपस्थित असल्याने तेथील वातावरण खूपच भावुक बनले होते. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेला मयूर चितारे हा फार्मासिस्ट असून त्याच्या परिवारात सर्वजण उच्चशिक्षित आहेत.

मयूर चितारे याचा खून झाल्यानंतर त्यांची बहीण डॉ. कोमल शाम चितारे यांनी आरोपी अर्जुन स्वामी काळे (रा.गांधीचौक, भाजी मंडई, दौंड ता.दौंड जि.पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. मयूर याचा खून दि. 03/12/2022 रोजी सायंकाळी 07/00 वाजण्याच्या सुमारास नवीन कुरकुंभ मोरी समोरील रोडवर हुतात्मा चौक बाजुकडे रस्त्याचे कडेला करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. 03/12/2022 रोजी सायंकाळी 07/10 वाजण्याचे सुमारास डॉ. कोमल चितारे ह्या महालक्ष्मी हाॅस्पीटलमध्ये काम करीत असताना त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या ओळखीचे विपुल वाघमारे यांनी फोन करून,‘‘दौंड येथील नवीन कुरकुंभ मोरी समोरील रोडवर हुतात्मा चौक बाजुकडे तुमचा भाऊ मयुर चितारे हा रक्ताबंबाळ होवुन रस्त्यावर पडलेला आहे.’’ असे सांगीतले. त्यावेळी तुम्ही त्यास लगेच महालक्ष्मी हॉस्पीटल येथे घेवुन या असे डॉ.कोमल यांनी त्यांना कळविले असता विश्वजीत चितारे, दिपक चितारे व इतर असे मयुर यास रिक्षाने महालक्ष्मी हॉस्पीटल येथे घेवुन आले. त्यावेळी डॉ.कोमल यांनी त्यांचा भाऊ मयुर चितारे यास रक्ताच्या थारोळ्यात पाहीले त्यावेळी त्याच्या तोंडावर, डोक्यास, हातावर व पायावर ठिकठिकाणी वार होवुन जखमा झालेल्या दिसत होत्या. तर त्यावेळी महालक्ष्मी हॉस्पीटल येथील डयुटीवर असलेल्या डॉक्टरांनी त्यास तपासुन तो उपचारापुर्वीच मयत झाला असल्याचे सांगीतले.

त्यानंतर डॉ.कोमल यांना विश्वजीत चितारे याने सांगीतले की,‘‘दि. 03/12/2022 रोजी सायंकाळी 07/00 वाजण्याचे सुमारास मी कामानिम्मीत्त माझे मोटार सायकलवरून दौंड शहरात जात असताना नवीन कुरकुंभ मोरी समोरील रोडवर हुतात्मा चौक बाजुकडे रस्त्याचे कडेला मयुर चितारे यांच्या अंगावर अर्जुन स्वामी काळे हा कोयत्याने वार करत असताना दिसला. त्यावेळी मी माझी मोटार सायकल बाजुला लावुन त्याचे जवळ पळत गेलो त्यावेळी अर्जुन काळे हा तेथुन पळुन गेला. त्यानंतर मी व दिपक चितारे तसेच इतर लोक असे आम्ही तेथुन जाणारी एक रिक्षा थांबवुन त्या रिक्षामधुन काका मयुर चितारे यास घेवुन महालक्ष्मी हाँस्पीटल मध्ये आलेलो आहे.’’असे सांगीतले.

मयूर चितारेच्या हत्येतील आरोपी अर्जुन स्वामी काळे याचे यापुर्वीही मयुर चितारे याच्याशी वाद झालेले होते व त्याच वादाच्या कारणारून अर्जुन स्वामी काळे याने कोयत्याने माझा भाऊ मयुर चितारे यास जिवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याचे अंगावर ठिकठिकाणी कोयत्याने वार करून त्यास जीवे ठार मारले असल्याचे डॉ.कोमल यांनी फिर्यादित म्हटले आहे. आरोपी अर्जुन काळेवर दौंड पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून खून करून आरोपी स्वतः दौंड पोलीस ठाण्यात हजर झाला होता. दाखल अधिकारी -पो.स.ई/गोसावी, तपासी अधिकारी -पो.स.ई/आबनावे.