|सहकारनामा|
दौंड : यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्यानंतर यवत पोलिसांनी गुप्तपणे तपास करत 3 मोटार सायकली चोरणाऱ्या इसमाचा शोध घेऊन त्यास जेरबंद केले आहे.
यवत पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रमेश कदम व पोलीस नाईक अजिंक्य दौंडकर यांनी मोटारसायकल चोरी करणारा आरोपी सतीश बाबासाहेब कुल (रा. राहु तालुका दौंड) यास ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने तीन मोटरसायकल चोरल्याचे कबूल केले. त्यानुसार सदर पथकातील कर्मचाऱ्यांनी नमूद आरोपीकडून यवत पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीस गेलेल्या तीन मोटारसायकली हस्तगत केले आहेत. सदरची कामगिरी डॉ.अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मिलिंद मोहिते अप्पर पोलीस अधीक्षक बारामती, राहुल धस उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस हवालदार रमेश कदम, पोलीस नाईक अजिंक्य दौंडकर, ASI जगताप, पोलीस हवालदार जाधव, पोलीस नाईक कोळेकर पोलीस मित्र रमेश चव्हाण, उमेश चव्हाण यांनी केली आहे.