मुंबई : खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला असून त्यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने मंजूर केल्याने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तब्बल 100 दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला असला तरी ईडीनं मात्र कोर्टात या जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली असल्याने यावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून खासदार संजय राऊत यांचा नाव लौकिक असून त्यांना पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात ईडी ने 31 जुलै रोजी ताब्यात घेतले होते. ईडीनं अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांची रवानगी अर्थररोड कारागृहात करण्यात आली होती.
आज त्यांचा जामीन मंजूर झाल्यानंतर शिवसेनेमध्ये आनंदाची लाट पसरली असून इडी ने त्यांच्या जामीन निर्णयावर हरकत घेतल्याने पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.