दौंड : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयी अर्वाच्य भाषेत टीकाटिप्पणी केल्याने दौंड राष्ट्रवादी काँग्रेस (लीगल सेल) पक्षाच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला.
दौंड चे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. यावेळी पक्षाच्या लीगल सेलचे अध्यक्ष ऍड. सुरेश जाधव,ऍड. अजित बलदोटा, संदीप येडे, राहुल धावडे, सचिन शिंदे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष आनंद पळसे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष हरेश ओझा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सचिन गायकवाड,निखिल स्वामी, साईनाथ इंगोले आदी उपस्थित होते.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह टीका करून प्रतिष्ठित महिलेचा अपमान होईल असे जाणीवपूर्वक वक्तव्य केले आहे. सुप्रिया सुळे यांच्या वरील या वक्तव्यामुळे पक्षातील नेते कार्यकर्ते यांच्या भावना दुखावल्या आहेत व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी जाणीवपूर्वक खासदार सुप्रिया सुळे यांचा अपमान केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेध करीत आहे. असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे. अब्दुल सत्तार यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी ही निवेदनातून करण्यात आली आहे.