पुणे : “बारामती शहरात पिस्तूलातून गोळीबार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी या गुन्ह्यातील 5 आरोपिंना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व बारामती पोलीसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. आरोपिंवर कठोर कारवाई केल्यास बारामतीतील भाईगिरी आणि गुन्हेगारीला चाप बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि.०३/११/२०२२ रोजी सायंकाळी जळोची, बारामती या गावच्या हद्दीतील जळोचीरोड शेजारी असलेल्या चाय चसका नावाच्या चहाच्या दुकानासमोर ऋत्वीक जीवन मुळीक हा रस्ता ओलांडत असताना तुषार भोसले याने मोटार सायकलवर कट लागल्याचे कारणावरून दहशत माजविण्याकरीता “बारामतीचा बाप आहे मी” असे म्हणून फिर्यादीस हाताने मारहाण केली तसेच शिवीगाळ व दमदाटी करून निघून गेला. यानंतर रिलायन्स पेट्रोलपंप येथे पुन्हा शुभम राजापुरे, तुषार भोसले यांनी त्यांच्या 7 ते 8 साथीदारांसह हातात कोयता घेऊन मोटारसायकलवर येऊन बारामतीत फक्त माझीच दादागिरी चालते असे म्हणत दहशत माजवण्याचे उद्देशाने फिर्यादी व त्यांचा मित्र गणेश जाधव, अतुल भोलाकर यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केले व यावेळी त्यांच्याकडे असणाऱ्या बंदुकीतून दोन गोळया झाडून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या गोळीबारात गणेश जाधव याच्या पोटावर डाव्या बाजूला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला होता. त्याबाबत बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन पुणे ग्रामीणचा नुकताच कार्यभार स्विकारलेले पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अ.पो.अ, पुणे विभाग मितेश घट्टे, मा. अ.पो.अ. बारामती विभाग मिलींद मोहिते, SDPO बारामती विभाग, गणेश इंगळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व बारामती तालुका पो.स्टे. चे पो.नि. प्रभाकर मोरे यांना सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार पो.नि. अशोक शेळके यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. नेताजी गंधारे, स.पो.नि. सचिन काळे, पो.स.ई. अभिजीत सावंत, पो.स.ई.श्री.अमित सिद-पाटील, सहा. फौज.
प्रकाश वाघमारे, मुकुंद कदम, काशीनाथ राजापुरे, हनुमंत पासलकर, पो.हवा ज्ञानदेव क्षिरसागर, आसिफ शेख, अभिजीत एकशिंग,
सचिन घाडगे, स्वप्निल अहिवळे, रामदास बाबर, राजु मोर्मीन, अजित भुजबळ, विजय कांचन, पो.ना.मंगेश थिगळे, निलेश शिंदे,
अमोल शेंडगे, बाळासाहेब खडके, पो.कॉ.प्राण येवले, धिरज जाधव, दगडु विरकर यांची ३पथके नेमली होती. तसेच बारामती तालुका पो.स्टे. येथील पो.नि. प्रभाकर मोरे यांचे नेतृत्वाखाली स.पो.नि.योगेश लंगोटे, पो.स.ई. दडस-पाटील, पो.हवा. राम कानगुडे, पो.हवा. नरूडे, पो.कॉ.दराडे यांचे पथक नेमलेले होते.
एलसीबी पथक व बारामती तालुका पो.स्टे. पथकापैकी बारामती तालुका पोलीस स्टेशनकडील पथकाने तुषार चंद्रकांत भोसले
व सुरज राजु काशीद यांना पकडले.
या गुन्ह्यातील उर्वरीत आरोपिंचा शोध घेत असताना एलसीबी पथकास गोपनीय
बातमीदारामार्फत या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शुभम राजपुरे हा पिंपरी चिंचवड हद्दीतील एका लॉजवर त्याच्या साथिदारांसह थांबला असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लॉजवर जाऊन १) शुभम विकास राजपुरे, २) तेजस
रतीलाल कर्चे, ३) विक्रम लालासो बोबडे यांना ताब्यात घेतले. सदर गुन्हयातील मुख्य आरोपी असणारा आरोपी शुभम राजपुरे याच्याविरोधात एकुण १३ गुन्हे दाखल असून त्यामध्ये खुन-१, खुनाचा प्रयत्न- १, दरोडा-१, जबरी चोरी-२, खंडणी-१, अवैध अग्नीशस्त्र बाळगलेबाबत-२, मारामारी – २,
चोरी- ३ असे गुन्हे दाखल आहेत. सध्या तो भोसरी येथील खुनाच्या गुन्ह्यात कोरोना कालावधीत सन २०२० मध्ये जेलमधुन रजेवर
सुटलेला होता. सदर गुन्हयातील आरोपींविरोधात दाखल असणारे गुन्हयांची माहिती घेऊन आरोपींविरोधात प्रभावी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे.
आरोपिंवर ‘मोक्का’ची कारवाई होणार!
पुणे ग्रामीण जिल्ह्यात अवैध पिस्तूल, व अग्नीशस्त्रे बाळगणारे इसम व सक्रीय असणाऱ्या टोळयांची माहिती संकलीत करून
सक्रीय टोळयांविरोधात तडीपारी व मोक्का अंतर्गत जास्तीत जास्त कारवाया पुणे ग्रामीण पोलीसांमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यानी दिली.
गोळीबार प्रकरणात पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे.
१) तुषार चंद्रकांत भोसले, (वय २२ वर्षे, रा.रूई पाटी, बारामती)
२) सुरज राजु काशीद, (वय २७ वर्षे, रा. सावळ, बारामती)
३) शुभम विकास राजपुरे, (वय २४ वर्षे, रा. राजपुरेवाडी, मुर्टी मोडवे, ता.बारामती, जि. पुणे)
४) तेजस रतीलाल कर्चे, (वय २१ वर्षे, रा. सुर्यनगरी, एम.आय.डी.सी., बारामती)
५) विक्रम लालासो बोबडे, (वय २६ वर्षे, रा. रूई सावळ, बारामती)