Murder – रांजणगाव गणपती येथे भंगार व्यावसायिकाने दृश्यम चित्रपटाप्रमाणे केला ‛खुन,’ LCB पुणे ग्रामीण ने खूनाचा असा केला ‛उलगडा’



|सहकारनामा|

पुणे : रांजणगाव एम.आय.डी.सी. समोरील पुणे-अहमदनगर रोडलगत तोरणा हाॅटेल नजीक असलेल्या लाकडाचे वखारीजवळ राहणारा आषिशकुमार सुभाशचंद्रकुमार गौतम (वय 23 वर्षे) हा दि.17/05/2021 रोजी पहाटे 05ः00 च्या सुमारास राहत असलेल्या ठिकाणाहून कोणासही काही एक न सांगता निघुन गेला असलेबाबत त्याचा चुलत भाऊ अवनीश रामब्रिश कुमार याने रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे मानव मिसींग तक्रार दिली होती व सदर मानव मिसींग बाबत संशय निर्माण होत असल्याने मिसींग व्यक्तीचा नातेवाईक अवनीश रामब्रिश कुमार (रा. सोहम पार्क, रांजणगाव गणपती ता. शिरूर जि.पुणे) याने रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन गु.रजि.नं. 217/2021, भा.दं.वि.कलम 364, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. 

मिसींग झालेली व्यक्ती वखारीजवळ राहणारा आषिशकुमार सुभाशचंद्रकुमार गौतम (वय 23 वर्षे, रा. तोरणा हाॅटेल जवळ लाकडाचे वखारीमागे, रांजणगाव गणपती ता. शिरूर जि.पुणे) याचे बाबत घातपात झाला असावा असा संशय वाढत चालल्याने मा. पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख साो. यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट साो. यांना सुचना करून बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते साो., दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश धस साो. यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक नेमण्यास सांगितले होते. 

त्याप्रमाणे  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट साो. यांनी सपोनि. सचिन काळे, म.पोसई देशमुख मॅडम, पोहवा. जनार्दन शेळके, पो.ना. राजु मोमीण, पो.ना. अजित भुजबळ,पोना चंद्रकांत जाधव, पो.ना. मंगेश थिगळे, म.पो.हवा. नंदा कदम, म.पो.काॅ. पुनम गुंड, चा.पो.हवा. मुकेश कदम यांचे तपास पथक नेमण्यात आले होते. रांजणगाव पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मानव मिसींगचा सखोल तपास करून दाखल गुन्हयातील आरोपींच्या हालचालींवर पाळत ठेवली होती.

यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील अपहरीत इसम आषिशकुमार सुभाशचंद्रकुमार गौैतम हा दि. 17/05/2021 रोजीचे पहाटेच्या वेळी इस्लाम बिस्मील्ला सम्मानी याचे घरात आल्याचे इस्लाम सम्मानी व त्याचे मुलांनी पाहीले, त्या गोष्टीचा राग आल्याने आरोपी इस्लाम बिस्मील्ला सम्मानी याने मुलांचे मदतीने त्याचा खुन केला असावा असा संशय आल्याने इस्लाम बिस्मील्ला सम्मानी (वय 41 वर्षे, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) यास ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने सांगितले की, दिनांक 17/05/2021 रोजी पहाटे 02.45 वाजण्याचे सुमारास इस्लाम हा लघवीसाठी उठलेला असताना त्यास आषिशकुमार सुभाशचंद्रकुमार गौैतम हा इस्लाम सम्मानीचे घरात आल्याचे समजले, म्हणून त्याने त्याची दोन मुले अब्दुल व रियाज यांना उठवून त्या तिघांनी मिळून आषिशकुमार यास लाकडी दांडक्यांनी व लोखंडी राॅडने मारहाण करून त्यास जिवे ठार मारले असल्याचे सांगितले.

त्यामुळे त्याचा मुलगा रियाज इस्लाम सम्मानी  (वय 20 वर्षे, रा. रांजणगाव गणपती ता. शिरूर, जि. पुणे) यास देखील ताब्यात घेवून दोन्ही आरोपी 1) इस्लाम बिस्मील्ला सम्मानी (वय 41 वर्षे, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे)  2) रियाज इस्लाम सम्मानी (वय 20 वर्षे, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) यांना दोघांना रांजणागाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले असुन पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व मदतनीस पोना विलास आंबेकर हे करत आहेत.

या कारवाईत सपोनि सचिन काळे

मपोसई देशमुख मॅडम, पोहवा जनार्दन शेळके, पोना राजू मोमीन, पोना अजित भुजबळ, पोना चंद्रकांत जाधव, पोना मंगेश थिगळे, पोहवा नंदा कदम, पोकॉ पूनम गुंड, पोहवा मुकेश कदम यांनी सहभाग घेतला आहे.