दौंड : (केडगाव)
तुम्हाला अर्जंट कुठेतरी जायचे आहे आणि तुमच्याकडे असलेल्या सीएनजी (CNG) वाहनातील गॅस मात्र संपत आला आहे. त्यावेळी तुम्हाला सर्वात जास्त टेंशन येते ते सीएनजी (CNG) गॅस भरण्यासाठी वाहनांच्या मोठ्या रांगेत उभे राहण्याचे. मात्र आता लवकरच पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव-वाखारी हद्दीत असणाऱ्या वाकडा पूल येथे मोठे सीएनजी (CNG) गॅस स्टेशन सुरु होत आहे.
काल दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ‘शुभम सीएनजी स्टेशन’ चे भूमिपूजन दौंडचे माजी आमदार रमेश थोरात आणि त्यांचे सुपुत्र गणेश (तुषार) थोरात यांच्याहस्ते पार पडले. या सीएनजी गॅस स्टेशनचे ओनर केडगावचे प्रसिद्ध उद्योगपती राजेंद्र आनंदा मलभारे हे आहेत.
सीएनजी (CNG) गॅस स्टेशनचे संचालक शुभम राजेंद्र मलभारे यांनी या गॅस स्टेशनची माहिती देताना, सुरुवातीलाच या गॅस स्टेशवर सहा गॅस पंप बसविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे कोणत्याच सीएनजी वाहनाला आता सीएनजी (CNG) भरताना प्रतीक्षा करावी लागणार नाही आणि त्यामुळे वेळ आणि पैशांचीही मोठी बचत होणार आहे.
या गॅस स्टेशनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या पंपावर भरला जाणारा गॅस हा ऑनलाईन पद्धतीने भरला जाणार असून त्यामुळे गॅस टाकीत कमी वेळेत जास्त प्रमाणावर गॅस भरला जाईल. त्यामुळे वाहनांचे मायलेज वाढून लांब पल्ल्यासाठी चालणाऱ्या वाहनांना त्याचा मोठा उपयोग होणार आहे.
केडगाव-वाखारी परीसरातील वाहनांना या ऑनलाईन सीएनजी स्टेशनमुळे मोठा फायदा होणार असून आता वाहनांच्या रांगेत तासंतास उभे राहण्याच्या कटकटीपासून त्यांची सुटका होणार आहे.