शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आता 31 ऑक्टोबर शेवटची तारीख

पुणे : अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेली प्रि-मैट्रिक शिष्यवृत्ती (इयत्ता १ ली ते १० वी), बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती (इयत्ता ९ वी ते १२ वी फक्त मुली), राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (इयत्ता ९ वी ते १२ वी), दिव्यांग विद्यार्थ्यासाठी असलेली मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती (इयत्ता ९ वी व १० वी) या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी एनएसपी २.० www.scholarships.in या संकेतस्थळावर ३१ ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. तसेच नुतनीकरणासाठी प्रत्येक वर्षी विद्यार्थ्याने अर्ज भरणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी www.scholarships.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावे, असे आवाहन शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.