|सहकारनामा|
पुणे : हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहनचोरीच्या घटनेत वाढ झाल्याने वरिष्ठांच्या आदेशाने वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्याकरिता हडपसर पोलीस स्टेशनचे तपासपथकाचे प्रभारी सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार सोनवणे, पोलीस हवालदार गायकवाड, पो.ना. गोसावी, पो. ना. पांडूळे, पोलीस शिपाई शेख, पोलीस शिपाई शेख, पोलीस शिपाई टोणपे, पोलीस शिपाई नाळे, पो.शि.
पवार, व पो.शि. दुधाळ असे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो., हडपसर स्टेशन, पुणे यांचे दोन पथके तयार करुन हडपसर पोलीस स्टेशनच्या हददीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पो.शि
अकबर शेख व प्रशांत दुधाळ यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की पोलीस स्टेशन परीसरात चोरी करणारे तीन इसम संशयीत चोरी केलेल्या मोटार सायकल वर फिरत असुन ते शेवाळवाडी पेट्रोल पंपाकडुन मांजरीकडे येणार असल्याचे खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्याप्रमाणे शेवाळवाडी मांजरी पुणे रोडवर वरील वर्णनाचे तिन इसम व मोटर सायकलचा शोध घेणेकरिता पोलीस
थांबले असता एका लाल रंगाचे युनिकॉर्न मोटार सायकलवर तीन इसम सोलापूर रोडने मांजरीकडे जोरात येत असताना पोलिसांना दिसले. त्यावेळी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते न थांबता पळुन जावु लागले. म्हणुन पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन थोडया अंतरावर मोटार सायकलसह आरोपींना पकडून त्यांना त्यांचे नाव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांचे नावे १) फैज आरिफ अन्सारी ऊर्फ बेनटेन वय २२ वर्षे रा. स.नं. ७४ लेन नंबर-२०/ए मोहम्मदवाडी रोड,बागवान स्टार जवळ सय्यदनगर हडपसर पुणे. व इतर दोन विधी संघर्षीत बालक असल्याचे सांगितले. त्यांना
पळुन जाण्याचे कारण विचारले असता ते उडवाउडवीचे उत्तरे देवु लागले. तेंव्हा त्यांचेकडे असलेल्या लाल रंगाची होन्डा युनिकॉर्न कंपनीच्या मोटर सायकल नंबर- एम.एच. ४३ ए.पी. ६०१ या गाडीचे कागदपत्राची मागणी केली असता नमूद मोटार सायकलचे कागदपत्रे त्यांचेकडे नसल्याचे त्यांनी सांगितले.
तेंव्हा त्यांना तपास पथकातील स्टाफच्या मदतीने मोटार सायकलसह हडपसर पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांना विश्वासात घेवुन त्यांचेकडे असलेल्या मोटार सायकलबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरची मोटर सायकल त्यांनी साडेसतरानळी हडपसर पुणे येथुन चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की फैज ऊर्फ बेनटेन हा
हडपसर परीसरामध्ये पाव विक्रीचा व्यवसाय करीत असुन त्याच्या आडुन तो परीसरातील वाहनांची रेकी करीत असे व त्यानंतर आपल्या वेगवेगळया साथीदारांच्या मदतीने त्यांनी चो-या केले असल्याची कबुली दिली.
या आरोपींकडून १० गुन्हे उघड झालेले असून त्यांच्याकडून ४ लाख २० हजारांच्या १४ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत तर चार मोटार सायकल मालकांचा शोध घेण्याचे काम चालु आहे. आरोपींचे इतर दोन साथीदार हे फरार असुन त्यांचा शोध घेतला जात आहे.
सदरची कामगिरी ही मा.श्री.नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा. नम्रता पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर, यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा.श्री. कल्याणराव विधाते, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. राजु अडागळे, पोनि.(गुन्हे) श्री. दिगबर शिंदे पोनि (गुन्हे) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षिरसागर, पोलीस नाईक अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, पोलीस शिपाई शाहीद शेख, अकबर शेख, शशिकांत नाळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.