या प्राण्याचा फोटो पाहून तुम्हाला थोडावेळ धडकी भरली असेल किंवा घाबरगुंडी सुद्धा उडाली असेल. कारण तुम्ही ज्या हॉरर मुव्ही किंवा मालिका पाहिल्या असतील त्यात दिसणारी पात्रे आणि वरील भीतीदायक वाटणारा चेहरा तुम्हाला सारखाच वाटला असेल, मात्र थोडे थांबा कारण या प्राण्याची माहिती समजल्यानंतर तुमची भीती तर दूर होईलच उलट त्याबाबत तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
हा प्राणी दुसरा तिसरा कुणी नसून आपल्या सभोवताली असणारी ‘मुंगी’ आहे. आश्चर्य वाटले ना! पण हे खरं आहे आणि इतिहासात पहिल्यांदाच तीचा एवढ्या जवळून इतका क्लिअर फोटो काढण्यात यश आले आहे. हा फोटो डिजिटली एडिटेड नसून अगदी खरा असल्याचे हा फोटो प्रसिद्ध करणाऱ्यांचे म्हणणे आहे. ह्यावर्षी निकॉन कॅमेराने आयोजित केलेल्या ‘2022 स्मॉल वर्ल्ड मायक्रोफोटोग्राफी स्पर्धेत’ ह्या फोटोला बक्षीस मिळाले आहे. Eugenijus Kavaliauskas ह्या फोटोग्राफरने मुंगीचा फोटो टिपून त्याला 5x सूक्ष्मदर्शकाखाली झूम केले आहे.
आश्चर्य वाटले ना पण ही तीच पिटुकली मुंगी आहे जी तुमच्या घरात, अंगणात, भिंतींवर किचनमध्ये निवांत ग्रुप करून फिरत असते. आणि आपण मात्र तिच्यापासून कुठलीही भीती न बाळगता बिनधास्तपणे राहत असतो. ही कधी कधी डोळ्यांनाही न दिसणारी मुंगी जवळून इतकी खतरनाक वाटतअसेल याची कुणी कल्पनाही केली नसेल.