दौंड रोटरी क्लबने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची दिवाळी केली गोड

दौंड : दौंड रोटरी क्लबच्या वतीने
शेअरिंग हॅपिनेस या कार्यक्रमांतर्गत दौंड मधील सडक आश्रमातील मुले, मुली या सर्वांसाठी दिवाळीसाठी मिठाई त्याचबरोबर सर्व मुलांना नवीन कपडे व फटाक्याचे वाटप करण्यात आले.

सडक आश्रम ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून दौंड परिसरातील गरीब, होतकरू ,वंचित मुलांना घडवण्याचं काम करत आहे. याची दखल रोटरी क्लब ने घेतली. दौंड रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.राजेश दाते, रो दिनेश भागवत, रो हरेश लुंड ,रो डॉ विशाल मिसाळ, रो डॉ. विनोद पोखरणा ,रो शालिनी पवार , रो संपदा दुधाट व रोट्रॅक्ट क्लब चे अध्यक्ष प्रेम बनसोडे हे सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते.