दौंड उपजिल्हा रुग्णालयात अँटीकरप्शन ची ‘रेड’, मोठ्या अधिकाऱ्यांसह दोघांवर कारवाई

अख्तर काझी

दौंड : दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांच्यासह तेथील शिपाई खोत यांना 5 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगे हात पकडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार व्यक्तीचे विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र हरवले असल्याने दुबार विवाह नोंदणी प्रमाणपत्र एका दिवसात देण्यासाठी दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.संग्राम डांगे व शिपाई खोत यांनी पाच हजाराची लाच मागितली होती. त्यामुळे याबाबत तक्रादार यांनी लाचलूचपत विभागाला ही माहिती कळवली होती. लाच देण्याचा दिवस ठरल्यानंतर वरील दोघांना लाचलूचपत विभागाने लाच घेताना पकडले आणि त्यांच्यावर कारवाई केली.

या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, तक्रारदार व लाच स्वीकारणारे यांचे जाबजबाब घेण्यात येऊन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.