‘पर्यावरण पूरक’ गणेशोत्सव स्पर्धेत गजानन मित्र मंडळ ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

दौंड : स्वर्गीय कि. गु .कटारिया पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धेत युथ क्लब गजानन मित्र मंडळ (फराटे गल्ली) या मंडळाने प्रथम क्रमांक प्राप्त केल्याची माहिती राष्ट्रीय हरित सेनेचे पथकप्रमुख प्रमोद काकडे यांनी दिली.

शेठ जोतिप्रसाद विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाडू माती गणपती रंगवणे स्पर्धा तसेच स्वर्गीय कि.गु. कटारिया उर्फ बाबूशेठ बोरीकर यांच्या स्मरणार्थ घेतल्या जाणाऱ्या कि. गु.कटारिया पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शेठ जोतिप्रसाद विद्यालयात संपन्न झाला. याप्रसंगी शाडू माती गणपती रंगवणे स्पर्धेत सहभागी झालेल्या दौंड शहरातील विविध माध्यमिक शाळा मधील सहभागी व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना सन्मानपत्र भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया, प्रशालेचे प्राचार्य सुखदेव खाडे, उपमुख्याध्यापिका रंजना मस्के,पर्यवेक्षक मोहन खळदकर,पर्यवेक्षिका डायना पिटर आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते देण्यात आले.

पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – युथ क्लब गजानन मित्र मंडळ, फराटे गल्ली (प्रथम क्रमांक) साई गणेश मित्र मंडळ देऊळगाव राजे (द्वितीय क्रमांक) श्री गणेश मित्र मंडळ शालीमार चौक (तृतीय क्रमांक ) राष्ट्रीय तरुण मित्र मंडळ वडार गल्ली (उत्तेजनार्थ) सर्व विजेत्या गणेशोत्सव मंडळांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या मंडळांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय हरित सेनेचे पथक प्रमुख प्रमोद काकडे, ज्येष्ठशिक्षक शिवाजी रसाळ, सोमनाथ चव्हाण, उमेश पलंगे, उदय गोलांडे, विजय बारवकर, सुग्रीव कांबळे, राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी व प्रशालेतील सर्व सेवक वृंदांचे सहकार्य लाभले.