Social Work : झाडे लावा – झाडे जगवा उपक्रमांतर्गत दौंडमध्ये तब्बल 1000 झाडे लावण्यास सुरुवात, नगरसेवक राजेश गायकवाड यांचा स्तुत्य उपक्रम



|सहकारनामा|

दौंड : झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमांतर्गत दौंड शहरातील  विविध भागामध्ये तब्बल 1000 झाडे लावण्याचा संकल्प दौंड नगरपालिकेतील नागरिक हित संरक्षण मंडळाचे गटनेते राजेश गायकवाड यांनी केला आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधित राजेश गायकवाड दरवर्षी 1000 झाडे लावण्याचा उपक्रम राबवितात, जागतिक पर्यावरण दिनी गायकवाड यांच्या एका जिवलग मित्राचे निधन झाले त्यामुळे 5 जून रोजी गायकवाड यांना या उपक्रमास सुरुवात करता आली नाही. 

राजेश गायकवाड यांनी यावर्षी शहरातील ख्रिशचन दफन भूमी,उपजिल्हा रुग्णालय, रेल्वे कामगार मैदान, राज्य राखीव पोलीस दल या परिसरामध्ये वृक्षारोपणाची मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. ज्या संस्था,समाज,संघटनांच्या वतीने त्यांच्याकडे रोपांची मागणी होते त्यांना गायकवाड  रोपे मोफत उपलब्ध करून देतात व वसुंधरा वाचविण्या साठीचे महत्व पटवून सांगतात.  

कोरोना काळात सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला त्यामुळे झाडांचे महत्व लोकांना समजले आहे त्यामुळे राजेश गायकवाड यांच्या झाडे लावा झाडे जगवा उपक्रमाला दौंडकर चांगला प्रतिसाद देत आहेत.