वारे पठ्ठे… रहायला हवेली तालुक्यात अण चोरी करायला दौंड तालुक्यात! वाहनांमधून लाखो रुपयांचे डिझेल चोरी करणारी टोळी ‛LCB’ कडून जेरबंद, 4 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त



|सहकारनामा|

पुणे : यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत दि ९/६/२०२१ रोजी मध्यरात्री नंतर नांदूर येथील एका कंपनी समोर पार्किंग मधिल  ५ ट्रक मधुन सुमारे ८३ हजार रुपये किंमतीचे डिझेल चोरीस गेले होते. तसेच दि  ११/६/२०२१ रोजी पारगाव येथील एका ट्रक मधून २५०००रु किंमतीचे डिझेल चोरीस गेले होते . वरील दोन्ही गुन्ह्यांची यवत पोलिस स्टेशन येथे भादवी 379 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एका विशिष्ट पथकाने तपास सुरू केला असता कोणताही पुरावा मिळत नसलेवरून गोपनीय बातमीदार मार्फ़त मिळाले माहितीवरून उरुळी कांचन परिसरातील काही संशयित इसम यांची नावे समोर आली. 

सदरच्या माहिती ची खात्री करून  उरुळीकांचन परिसरातील दत्तवाडी या ठिकाणी जाऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून खालिल इसम ताब्यात घेतले.

१)दत्ता विनोद रणधीर (वय २२ वर्षे रा दत्तवाडी उरुळी कांचन ता.हवेली जि. पुणे) 

२)राहुल उर्फ दगड्या मारुती मदने (वय २७ वर्षे रा. दत्तवाडी उरुळी कांचन ता.हवेली जि. पुणे) 

३) वैभव राजाराम तरंगे (वय १९ वर्षे रा  दत्तवाडी उरुळी कांचन ता.हवेली जि. पुणे) 

४) प्रतीक बन्सीलाल तांबे (वय २६ वर्षे रा  दत्तवाडी उरुळी कांचन ता.हवेली जि. पुणे) 

५) स्वरूप विजय रायकर (वय २३ वर्षे रा सूर्यवंशी मळा ,अष्टापुर फाटा  ता.हवेली जि. पुणे) 

६) धर्मेंद्र कुंडलिक टिळेकर (वय ३४ वर्षे रा टिळेकर वाडी ता. हवेली जि. पुणे) वरील इसम त्यांचे कडील एक मारुती सुजूकी कंपनीची अल्टो कार तसेच मारुती सुजूकी कंपनीची इर्तीगा कार घेऊन रात्री च्या वेळी बाहेर पडून वरील डिझेल चोरीचे गुन्हे करत होते . 

१)यवत पोलिस स्टेशन गु र नं ५१४/२०२१ भा द वी 379

२) यवत पोलिस स्टेशन गु र नं 

५२२/२०२१ भा द वी 379 

वरील दोन्ही गुन्हे केल्याचे वरील आरोपींनी पोलीसांना माहिती दिली आहे. यावरून त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा करतेवेळी एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल देखील चोरून नेला असल्याचे कबुल केले आहे. 

सदर आरोपीकडून 

 १) मारुती सुजूकी कंपनीची अल्टो कार किंमत रु: ८०,०००

२) मारुती सुजूकी कंपनीची इर्तीगा कार किंमत रु : ४ लाख 

३) गुन्ह्यातील चोरीस गेलेला सॅमसंग कंपनीचा j2 मोबाईल किंमत रु १०,०००

असा एकूण ४,९०,००० रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून , आरोपी आणि सदरचा मुद्देमाल पुढील तपास कामी यवत पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहेत.

सदरची कारवाई ही मा पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख सो अप्पर पोलिस अधिक्षक श्री मिलिंद मोहिते ,उपविभागीय पोलिस अधिकारी दौड विभाग श्री राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट , पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, पो ना विजय कांचन, पो ना राजु मोमिन, पो ना अभिजित एकशिंगे 

पो कॉ अमोल शेडगे, पो कॉ मंगेश भगत 

पो कॉ धिरज जाधव, म पो कॉ पूनम गुंड 

पो कॉ दगडू विरकर यांचे पथकाने केली आहे.