लॉकडाउन काळात जास्त दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणाऱ्या दौंड आणि पाटसच्या 2 वितरकांवर गुन्हे दाखल



|सहकारनामा|

दौंड : दौंड तालुक्यामध्ये दौंड शहर आणि पाटस येथील दोन वितरकांनी कोरोना (लॉकडाउन) काळामध्ये चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री केल्याचे आढळून आल्याने या दोन्ही वितरकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मे. श्रीनाथ इंटरप्रायजेस, ता.दौंड, जि.पुणे. येथे सचिन गोपाळराव चांदेकर, (रा.श्रीहरी अपार्टमेंट प्लॅट नं.२ विठ्ठल मंदिरासमोर दौंड, ता.दौंड, जि.पुणे) या आरोपीकडील मेडीकल ऑक्सीजन भरलेला सिलेंडरचा खरेदी व विक्री अभिलेखा पडताळला असता सदर वितरकाने रूग्णालयांना जास्त किंमत आकारून सिलेंडर विक्री केल्याचे आढळून आले आहे. हि गंभीर बाब असल्याने दौंड पोलिसांनी दौंड पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरूध्द भा.द.वी. कलम १८८, परीच्छेद १९ औषध किमत नियंत्रण आदेश २०१३ सह वाचन कलम ३(२)(सी), जिवनावश्याक वस्तूचे अधिनियम १९५५ उल्लंघन दंडनिय कलम ७(१)(अ)(२), तसेच औषधे व सौदर्य प्रसाधने कायदा १९४० चे कलम १८(सी) चे उल्लंघन दंडनिय २७(बी)(२), अन्वये गुन्हा दाखल केला असून गुन्हयाचा पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.

अशीच दुसरी घटना यवत पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या पाटस येथे घडली असून मे.नागेश्वर गॅस सप्लायर, (ता.दौंड, जि.पुणे) येथील आरोपी नामे नवनाथ महादेव बिनवडे, (रा.तामखडा पाटस, ता.दौंड, जि.पुणे) या आरोपीने कोविड १९ प्रादुर्भावाचे अनुषंगाने लॉकडाउनच्या काळात शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून अन्न व औषध प्रशासनाचा कोणताही परवाना (नमुना २० बी) मंजुर नसताना सदर वितरकाने दौंड तालुक्यातील मे.गुरुदत्त इंटरप्रायजेस (सर्वे नंबर २५४  यवत ता.दौंड, जि.पुणे) यांचेकडुन मेडीकल ऑक्सीजन भरलेले सिलेंडर खरेदी करुन दौंड तालुक्यातील वेगवेगळया रुग्णालयांना मेडीकल ऑक्सिजन भरलेले सिलेंडर जास्त किंमतीला पुरवठा करून विक्री केल्याचे आढळून आले आहे.

याबाबत मे.नागेश्वर गॅस सप्लायर पाटस या वितरकाने विनापरवाना औषध (मेडीकल ऑक्सिजन) विक्री व्यवसाय केल्याचे आढळुन आले आहे. म्हणुन यवत पोलिसांनी यवत पोलीस स्टेशन येथे वरील आरोपी यांचे विरूध्द भा.द.वि. कलम १८८, परीच्छेद १९ औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ सह वाचन कलम ३ (२) (सी), जिवनावश्यक वस्तुचे अधिनीयम १९५५ चे उल्लंघन, दंडनिय कलम ७ (१)(vs)(ii) तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० चे कलम १८ (सी) चे उल्लंघन

दंडनिय २७ (बी) (पप), अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हि कामगिरी डॉ.अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण पोलीस दल

हद्दीत कारवाई करण्यात आलेली आहे.