कर्जत : खून तसेच विनयभंगासारख्या तीन गंभीर गुन्ह्याच्या खटल्यात फरार असलेल्या आरोपीस कर्जत पोलिसांकडून मोठ्या शिताफिने अटक करण्यात आली आहे.
संतोष हौसराव गोयकर, (वय-33 वर्ष, रा. खंडाळा, ता कर्जत जिल्हा अहमदनगर) हा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय श्रीगोंदा तसेच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कर्जत यांचे न्यायालयात वारंवार गैरहजर होता त्यास वॉरंट काढले होते मात्र वारंवार शोध घेऊनही तो मिळून येत नव्हता.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय श्रीगोंदा यांच्याकडील एन बी डब्ल्यू वॉरंट 1)विशेष खटला नंबर 27/ 2019 मध्ये भादवि कलम 354 लहान मुलांना लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा
2) खुनाचा सत्र खटला क्रमांक 53/2019 भादविका कलम 302 वगैरे
3) माननीय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो कोर्ट कर्जत यांच्या कडील एस सी सी नंबर 710/2021 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 असे गुन्हे असलेला आरोपी हा मागील सात-आठ महिन्यापासून फरार होता.
कर्जत पोलिसांनी गोपनीय माहिती काढून त्यास दिनांक 16/09/2022 रोजी रात्री 12.00 वाजता मिरजगाव येथून अटक केली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक फौजदार बाळासाहेब यादव पोलीस जवान दीपक कोल्हे जालिंदर माळशखरे व कर्जत पोलीस स्टेशन स्टाफ यांनी केली.