आम्ही कोणताही उमेदवार पुरस्कृत केला नाही अथवा उभाही केला नाही.. नवनिर्वाचित अध्यक्षांची माहिती चुकीची असल्याचा शिक्षक समितीचा खुलासा



|सहकारनामा|

दौंड : दौंड तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेवर संदीप होले यांची चेअरमन पदी निवड  झाल्यानंतर त्यांनी माध्यमांना उमेदवारांबाबत दिलेली माहिती चुकीची असून आम्ही शिक्षक समितीच्या वतीने कोणताही उमेदवार पुरस्कृत केला नाही अथवा कोणत्या उमेदवार उभा केला नाही असा खुलासा शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आलेला आहे. दौंड तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप होले यांनी सहकारनामा व अन्य माध्यमांना दिलेली माहिती चुकीची असल्याचे शिक्षक समितीने म्हटले आहे.

दि. 10 जून रोजी सहायक निबंधक कार्यालयात पार पडलेल्या निवड प्रक्रियेत दौंड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार संदीप विश्वनाथ होले यांची 9 विरुद्ध 8 मताने निवड झाली होती. यावेळी होले यांच्या विरुद्ध बाळासाहेब काटे हे उमेदवार उभे होते त्यांचा केवळ एक मताने पराभव झाला होता.

होले यांनी माध्यमांना माहिती देताना बाळासाहेब काटे हे शिक्षक समिती पुरस्कृत उमेदवार होते असे अनवधानाने म्हटले होते.

ती बातमी वृत्तपत्र आणि ऑनलाइन मिडियाला आल्यानंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती दौंडचे अध्यक्ष शशिकीरण मांढरे, सरचिटणीस बापूराव खळदकर यांनी आम्ही शिक्षक समितीच्या वतीने कोणताही उमेदवार पुरस्कृत केला नाही, उमेदवार उभाही केला नाही त्यामुळे आलेले वृत्त हे खोडसाळ पणाचे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.