दौंड : केडगाव (ता.दौंड जि.पुणे) येथील बस मधील लेडीज बॅगमधून मधील १८ तोळे चोरणारा चोरटा यवत गुन्हे शोध पथकाने खेरवा मध्यप्रदेश येथून जेरबंद केला आहे.
दिनांक ३१/०७/२०२२ रोजी फिर्यादी अनुराधा आनंद चांडक (रा.पुणे मुळ रा.उस्मानाबाद) यांनी याबाबत फिर्याद दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार केडगाव गावचे हद्दीत असणाऱ्या हॉटेल समाधान समोर श्री विश्व ट्रॅव्हल्स बस नंबर एम एच २४ ए. बी.७५०० मध्ये फिर्यादी यांची लेडीज बॅग व त्यामधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व कागदपत्रे असे एकूण ११,१३,५००/- रुपये चोरीस गेले होते. या बाबत अज्ञात चोरट्या विरुद्ध यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात होता.
त्यानंतर यवत गुन्हे गुन्हे शोध पथकाने रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करून सदर हॉटेलचे सी.सी. टी.व्ही.फुटेज प्राप्त करून त्यातील एका संशयित इसमा विषयी माहिती घेण्यास सुरुवात केली सदरचा संशयित इसम हा धरमपुरी ता.मनावर जि. धार मध्यप्रदेश येथील असलेची माहिती यवत गुन्हे शोध पथकाचे स.पो.नि.स्वप्नील लोखंडे, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, पोलीस नाईक अक्षय यादव यांचे पथकाला खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती. त्यामुळे सदर पोलीस पथकाने संशईत ठिकाणी जाऊन त्या इसमाचा शोध व माहिती घेण्यास सुरुवात केली.
सलग ७ दिवस खलघाट, धरमपुरी, मनावर, उमरबन, खेरवा मध्यप्रदेश या भागात संशयित इसमाचा शोध घेतला असता सदर इसम खेरवा ता.मनावर जि. धार येथे असलेची माहिती पोलीस पथकास मिळाल्यानंतर मनावर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश अलवा व यवत पोलीस स्टेशन पथकाने इसम इस्माईल बाबू खान (वय ३६ रा.धरमपुरी बायपास ता.मनावर जि.धार राज्य मध्यप्रदेश) यास ताब्यात घेऊन उमरबन पोलीस चौकी येथे आणून सखोल चौकशी केली असता आरोपीने गुन्हा कबूल केला तसेच त्याकडून चोरीस गेलेले १८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
आरोपीला मे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दौंड यांनी दोन दिवस पोलीस कास्टडी रिमांड मंजूर केली असून सदरची कारवाई पोलीस निरीक्षक नारायण पवार, सपोनि स्वप्नील लोखंडे, यवत गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, दामोदर होळकर, वसीमोद्दीन शेख अकोला, पोलीस मित्र निलेश चव्हाण यांनी केली आहे.