दौंड : 13 घरफोडीतील आरोपी हे चौफुला येथे बसून मांडवगण फराटा येथे मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याचा प्लॅन तयार करीत असताना रात्रग्रस्त दरम्यान केडगाव पोलीसांनी या चोरट्यांना जेरबंद केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 06/08/2022 रोजी रात्रौ 03ः00 वा.चे सुमारास पो.ना सोनवणे ब.नं.1045 व पो.ना.कापरे ब.नं.2344 यांना गोपनीय बातमीदारामार्फत समजले कि काही इसम दरोड्याच्या तयारीत असून ते केडगाव-चौफुला येथे एकत्र जमलेले असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. ही माहिती वरील पोलिसांनी पो.नि.नारायण पवार व पोसई नागरगोजे यांना कळविली व केडगाव चौफुला येथे जावुन व्युहरचना आखुण चोरटे दरोडयाचे तयारीत असताना पोलीसांनी त्यांना जागेवर पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यातील 7 पैकी 1 चोरटा पळुन गेला तर 6 जणांना जागेवरच पकडण्यात यश आले.
या आरोपिंकडून अॅक्टीव्हा मोटार सायकल नंबर एम.एच.14 जी.के 1178 तिचे डिकीमध्ये एक कोयता, एक लोखंडी काटावणी, एक पक्कड, एक मिरची पावडरची पुड, एक बॅटरी असे साहित्य मिळुन आले. तसेच एक हिरो कंपनीची स्पेल्डंर प्लस मोटार सायकल नंबर एम.एच.38 ए.सी.4603 व चार मोबाईल वेगवेगळे किंमतीचे व कंपनीचे असे एकुन 1,15,310/- रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला असून आरोपिंची नावे पुढील प्रमाणे आहेत.
1) सुनिल मारूती लोणी (वय 22 वर्षे) 2) सौरभ दत्तात्रय शिंदे (वय 24 वर्षे दोघे रा. चिंचवड बालाजीनगर ता हवेली जि.पुणे) 3) राहुल राधाकिसन आगम (वय 21 वर्षे रा. दिघी आळंदी, खेड जि.पुणे) 4) अभिषेक सुनील चौधरी (वय 22 वर्षे) 5) राहुल रमेश चव्हाण (दोन्ही रा. केडगाव ता.दौंड.जि.पुणे) 6) विकास नारायण सानप (वय 19 वर्षे रा फरांदेनगर दिघी, ता खेड जि.पुणे) या आरोपिंना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी 13 घरफोडया केल्या असल्याचे कबुल केले आहे.
सदरची कामगीरी मा.पोलीस अधिक्षक सो डॉ अभिनव देशमुख सो,मा आप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस,पोलीस निरीक्षक नारायण पवार, याचे मार्गदर्शनाखाली पोसई नागरगोजे.पोलीस नाईक सोनवणे ब.नं.1045,पोलीस नाईक कापरे ब.नं.2344,पो.कॉ.भापकर ब.नं.2485, पो.कॉ.गडदे ब.नं.68, पो. कॉ. भारत भोसले ब न 1983, पोलीस मित्र राजेंद्र अडागळे, रामा पवार यांनी केलेली आहे. सदरचा तपास पोसई नागरगोजे हे करीत आहेत.