Gopichand Padalkar – आ.गोपीचंद पडळकर उद्या दौंड तालुक्यात, सुमारे 15 ठिकाणी घोंगडी बैठका! कोणत्या गावात किती वाजता जाणून घ्या…



|सहकारनामा|

दौंड : आपल्या  विशेष भाषण शैलीने संपूर्ण राज्यात ‛फेमस’ असलेले विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा उद्या दौंड तालुक्यात दौरा असून तालुक्यात सुमारे 15 ठिकाणी त्यांच्या घोंगडी बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

आज गुरुवारी रात्री उशीरा ते केडगाव येथे आबासाहेब चोरमले यांच्या निवासस्थानी मुक्कामी येणार असून शुक्रवारी सकाळी 9 वाजता पहिली बैठक ही केडगाव टोलनाका येथील वैदू समाजासोबत होणार आहे. 

या बैठकीनंतर खालील प्रमाणे संपूर्ण तालुक्यात त्यांच्या 15 ठिकाणी घोंगडी बैठका होणार आहेत.



आ.गोपीचंद पडळकर आणि पवार घराणे यांच्यातील वाकयुद्ध सर्वांना माहीत आहे त्यामुळे उद्या बैठकांमध्ये ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.