‘मोक्का’तील फरार आरोपीस कर्जत पोलिसांकडून अटक

कर्जत : मारहाण करून किमती ऐवज लुटणाऱ्या मोक्कातील फरार आरोपीस कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीवर भादवि कलम 392, 397 सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम 1991 चे कलम 3(1) अश्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

वरील गुन्ह्यामधील आरोपी शशिकांत सावता चव्हाण, (राहणार आंबीजळगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर) हा मोक्का कारवाई झाल्यापासून फरार होता. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, नगर ग्रामीण विभाग हे करत असून त्यांनी सदर आरोपी पकडने बाबत कर्जत पोलीस स्टेशनला स्टॅंडिंग वॉरंट पाठवून सूचना दिल्या होत्या. तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी सुद्धा सदर आरोपी अटक करणेबाबत वेळोवेळी कर्जत पोलिसांना संपर्क केला होता. त्यानुसार कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी कर्मचारी यांना सदर आरोपी पकडण्या बाबत सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना पाळत ठेऊन दिनांक 30/8/2022 रोजी आरोपी शशिकांत सावता चव्हाण हा भांडेवाडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यास सापळा लावून पकडले. त्यास पुढील तपास कामी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत आण्णासाहेब जाधव नगर ग्रामीण नगर ग्रामीण अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे पोलीस उपनिरीक्षक अनंतराव सालगुडे पोलीस अमलदार पांडुरंग भांडवलकर श्याम जाधव गोवर्धन कदम ईश्वर माने अमित बर्डे मनोज लातूरकर शकील बेग आदींनी केली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण अजित पाटील हे करत आहेत.