|सहकारनामा|
दौंड : राज्याचे माजी मंत्री व विद्यमान सदाभाऊ खोत यांचा शनिवारी दौंड तालुक्यात दौरा होणार आहे.
हा दौरा रावणगाव येथून सकाळी 10 वाजता सुरू होणार असून यावेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार समारंभ व सभा होणार आहे.
रावनगांव नंतर ते दुपारी 12 वाजता तालुक्यातील बेटवाडी तसेच गार, सोनवडी, नानविज या तीन गावाच्या संयुक्त पाणीपुरवठ्याच्या स्किमची पाहणी करणार आहेत. हि स्कीम सदाभाऊ खोत मंत्री असताना मंजूर करण्यात आली होती. तिचे काम आता अंतिम टप्प्यात असून त्या कामाची पाहणी करण्यात येणार आहे. जेवण आणि उर्वरित कार्यक्रम आटोपल्यानंतर पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेकडून देण्यात आली आहे.