Big News : दौंड पंचायत समितीस नगरपालिकेने दिलेल्या बांधकाम परवानगीस उच्च न्यायालयाचा मनाई आदेश!



|सहकारनामा|

दौंड : दौंड पंचायत समितीच्या नवीन व्यापारी संकुल व कम्युनिटी हॉल साठी दौंड नगरपालिकेने पंचायत समितीस दिलेल्या बांधकाम परवानगीस मा. उच्च न्यायालयाने तुर्तास मनाई आदेश दिला असल्याचे समोर आले आहे. 



दौंड नगरपरिषद हद्दीतील सी. टी. सर्वे क्रमांक 8 या जागेवर गटविकास अधिकारी, दौंड यांना दिनांक 22/2/2021 रोजी नगरपालिकेने बांधकाम परवानगी दिलेली होती. सदर बांधकाम परवानगी असलेल्या जागे लगत कब्जेदार म्हणून दौंड मर्चंट असो. चे अध्यक्ष राजेश पाटील यांनी दिनांक 22/3/2021 रोजी सदर बांधकाम परवानगीस हरकत घेतली होती व बांधकाम विभागाकडे विहित मुदतीत व विहित कलमान्वये अपील दाखल केले होते. सदरील अपिलावर कोणताच निर्णय न झाल्यामुळे राजेश पाटील यांनी याबाबत दिनांक 11/6/2021 रोजी मा. उच्च न्यायालयात रीट  पिटीशन नं 2072 अन्वये याचिका दाखल केली होती. यामध्ये दिनांक 22/6/2021 रोजी  उच्च न्यायालया मध्ये सदर याचिकेच्या गुण दोषांवर सुनावणी झाली यात राजेश पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा विचार करून उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांची स्थगिती दिली, व संचालक नगर रचना व मुल्यानिर्धारण यांना त्यांच्याकडे प्रलंबित असलेले उपरोक्त अपील दोन आठवड्यांच्या आत सुनावणीस घेऊन यावर निर्णय करण्याचे आदेश दिलेले आहेत व सदरील अपिलाचा निकाल पक्षकारांच्या विरोधात गेल्यास त्या पुढील एक आठवड्यापर्यंत स्थगिती असेल असे आदेश पारित केले आहेत. मा. उच्च न्यायालयात राजेश पाटील यांच्या वतीने ऍड. नरेंद्र वालावलकर व ऍड .सुरेश सब्रद यांनी युक्तिवाद केला.