dargah open – लॉकडाऊनमुळे अनेक महिन्यांपासून बंद असलेले सुपे येथील ‛शाहमन्सूर बाबा दर्ग्याचे’ दार अखेर उघडले



बारामती : सुपे ता.बारामती येथील हिंदू-मुस्लिम बांधवांचे श्रद्धेचे स्थान असलेले हजरत ख्वाजा शाहमन्सूर आरिफ बिल्लाह रहे. बाबा दर्ग्याचे द्वार आज दि.7 ऑक्टोबर रोजी सकाळी (पहाटे) फजरची नमाज झाल्या नंतर सर्व भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात आले आहे. यावेळी राज्य शासनाच्या सर्व कोविड नियमांचे पालन करून मग हे द्वार उघडण्यात आले आहे हे विशेष. 



द्वार उघडल्यानंतर उपस्थित भाविकांनी एक-दुसऱ्याला पेढे वाटून आनंद साजरा केला तर शाहमन्सूर दर्गा कमेटीने मुख्य गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करत फटाक्यांची आतषबाजी केली.

सर्व येणाऱ्या भाविकांनी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे, मास्क व सॅनिटाइजरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले असून भाविकांनी गर्दी करू नये, कोणत्याही कार्यक्रमास किंवा दर्गा परिसरात थांबण्यास परवानगी नसून सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन शाहमन्सूर दर्गा कमेटी तर्फे करण्यात आले आहे.

यावेळी ग्रामस्थ, भाविक, शाहमन्सूर दर्गा कमेटीचे विश्वस्त, मन्सूर युथ क्लबचे कार्यकर्ते उपस्थित असल्याची माहिती शाहमन्सूर दर्गा कमेटीचे चिफ ट्रस्टी युनूसभाई कोतवाल, खजिनदार समीर डफेदार, विश्वस्त अयूब शेख,गालीब शेख, मन्सूर युथ क्लबचे अध्यक्ष रफीक तांबोळी यांनी दिली.